

Stamp Duty Cannot Be Increased Based on Future Benefits in Redevelopment: Bombay HC
Sakal
ॲड. रोहित एरंडे, यद्याचे अभ्यासक
सध्या पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत आहेत. पुनर्विकास करारनामा (डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट) हा महत्त्वाचा दस्त असतो.कोणत्याही करारनाम्याला मुद्रांक शुल्क (स्टँम्प ड्युटी) किती भरायचे, यासाठी महाराष्ट्र मुद्रांक कायद्यामध्ये विविध तरतुदी आहेत आणि विशेषतः पुनर्विकास करारनाम्यासारख्या करारांवर योग्य मुद्रांक शुल्क किती असावे, हे निश्चित करण्याचा अधिकार मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे आणि हा खर्च बऱ्यापैकी असतो.