
Donald Trump’s import tariff policy
E sakal
A detailed analysis of America’s trade challenges and geopolitical implications.
प्रा. प्रदीप आपटे
pradeepapte1687@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे घसरत गेलेले उत्पादक वैभव परत मिळवण्याचा ‘पण’ केला आहे. त्यासाठी ज्या देशांसोबतच्या वस्तू-व्यापारात अमेरिकेला व्यापारी तूट दिसते, त्यांच्यावर भलते चढे आयातशुल्क लादण्याचा लढाऊ पवित्रा घेतला आहे. (व्यापारी तूट म्हणजे अमेरिकेने त्यांच्याकडून केलेली आयात मूल्यरूपात त्या देशांना अमेरिकेने केलेल्या निर्यात मोलापेक्षा जास्त दिसते). त्याचे वाढीव शुल्काचे आकडे प्रचलित दरापेक्षा अवाच्या सवा मोठे आहेत.
अमेरिकेने असे एकतर्फी प्रश्न छेडणे जगाला नवे नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर ‘ब्रेटन वुडस् करारा’नुसार डॉलरचे मूल्य सोन्याच्या बदल्यात स्थिर ठेवण्याची व्यवस्था होती. ती पत्करताना अमेरिकेची सर्व जगाला होणारी निर्यात भारी मोठी होती. परंतु, पंधरा वर्षांत ही स्थिती पालटू लागली. अमेरिकेला इतर देशांशी व्यापारात तूट येऊ लागली.
डॉलरचा करारात ठरलेला अंगभूत बडेजाव घसरणीला लागला. तेव्हा कोणी देशाने उचल खाऊन आम्हाला डॉलर नकोत; उलट ठरल्या दराने तेवढे सोने द्या, म्हटले तर अमेरिकेकडे तेवढा सोन्याचा साठा नसेल, असा धोका उद्भवू शकतो!
असा धोक्याचा इशारा १९५८ मध्येच रॉबर्ट ट्रिफिन या अर्थतज्ज्ञाने दिला होता. १९७१ मध्ये आता पाणी डोक्यावरून चालले आहे, या जाणीवेने करारातील डॉलर-सुवर्ण मोलाचे लग्न अमेरिकेने एकतर्फीपणे मोडले.
आंतरराष्ट्रीय व्यापारातील सध्याच्या पेचाचे नेमके स्वरूप विशद करणारा लेख.