
सिद्धार्थ खेमका, (मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )
सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या आयातशुल्क लादण्याच्या निर्णयामुळे जगभरात व्यापारयुद्धाची चिंता निर्माण झाली आहे.
त्याशिवाय भू-राजकीय तणाव, महागाई, ‘फेड’चे धोरण अशा विविध कारणांमुळे जागतिक शेअर बाजारात चढ-उतार होत आहेत, त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटताना दिसत आहेत.
अशा परिस्थितीत नव्या आर्थिक वर्षात काही नवे शेअर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे.