
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
एखाद्या मोठ्या कंपनीच्या विविध व्यवसायांतील काही व्यवसाय बाजूला करून वेगळी नवी कंपनी सुरू करण्याच्या प्रक्रियेला डीमर्जर म्हणजे विलगीकरण म्हणतात, तर याविरुद्ध वेगवेगळ्या व्यवसायांत असणाऱ्या दोन किंवा अधिक कंपन्या एकत्रित करून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात, त्याला मर्जर अर्थात विलीनीकरण म्हणतात. अलीकडच्या काळात डीमर्जरच्या प्रक्रिया वाढत आहेत, कारण यामुळे मोठ्या कंपनीला त्याच्या वेगवेगळ्या ब्रॅंडची विभागणी करून ते स्वतंत्रपणे चालवणे शक्य होते; तसेच कंपनीला तिच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येते.