

Bond Yield Impact on Commodities
esakal
ऋषिकेश उगले - rushikesh.ugale@mcqube.in
अमेरिकेतील दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील वाढता परतावा (बाँड यिल्ड) जागतिक कमोडिटी बाजारासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. डॉलरची मजबुती, व्याजदरवाढीच्या अपेक्षा आणि वाढते रोखे परतावे यामुळे सोने, चांदी, कच्चे तेल आणि औद्योगिक धातूंवर दबाव निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी रोखे बाजारातील हालचाली समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील जीडीपी, महागाई आणि बेरोजगारी या तीन प्रमुख घटकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. या तीन घटकांना नियंत्रित करण्यासाठी व्याजदर आणि त्यासोबत जोडलेला दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांचा परतावा (बॉँड यिल्ड) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉलरचा भाव आणि व्याजदर याबाबत गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात आर्थिक जाण असते; मात्र रोखे परताव्याचा कमोडिटी बाजारावर होणारा परिणाम समजून घेणे तुलनेने गुंतागुंतीचे ठरते.
अमेरिकी बाजारातील दहा वर्षांच्या रोख्यांचा परतावा जून २०२६ मध्ये ४.४ ते ४.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र, अमेरिकी फेडरल बँकेने हा परतावा ३.५० ते ३.७५ टक्क्यांच्या दरम्यान राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाजाराचा कल आणि अमेरिकी सरकारच्या अपेक्षा यांतील ही तफावत नेमके कोणते संकेत देते, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.