Premium|Wealth Mutual Fund : फ्लेक्सी कॅप फंड अधिक योग्य

Flexi Cap Fund : पँटोमॅथ समूहाचा भाग असलेला वेल्थ म्युच्युअल फंडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न पाठक यांची ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेली ही खास मुलाखत...
प्रसन्न पाठक यांची  मुलाखत...

प्रसन्न पाठक यांची मुलाखत...

E sakal

Updated on

How Flexi Cap Funds Balance Risk and Returns for Indian Investors

वसंत कुलकर्णी

vasant@vasantkulkarni.com

पँटोमॅथ समूहाचा भाग असलेला वेल्थ म्युच्युअल फंड उल्लेखनीय कामगिरी करत वेगाने प्रगती करत आहे. कंपनीने अल्पावधीतच नावीन्यपूर्ण फंड योजना आणून गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. कंपनीने पदार्पणातच फ्लेक्सी कॅप फंड आणून आपले वैशिष्टयपूर्ण धोरण दाखवून दिले.

या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्न पाठक यांची ‘सकाळ मनी’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेली ही खास मुलाखत...

प्रश्‍न : तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल सांगाल का?

पाठक : मी माझ्या व्यावसायिक कारकिर्दीला २३ वर्षांपूर्वी सुरवात केली. या कारकिर्दीत मी म्युच्युअल फंड, विमा, पीएमएस आणि एआयएफ या क्षेत्रातील विविध गुंतवणूक पर्यायांत माझे योगदान दिले.

मी सुरुवात बंगळूरमधील एचएलएल येथून केली. त्यानंतर मी मुंबईतील एसपी जैन इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले. त्यानंतर काही काळ फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडात रोखे गुंतवणूक व्यवस्थापित करणाऱ्या संघात काम केले. यूटीआय म्युच्युअल फंड, इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स आणि टॉरस म्युच्युअल फंडमध्येही मी काम केलेले आहे. टॉरस म्युच्युअल फंडाचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो.

‘एआयएफ’ या गुंतवणूक पर्याय उपक्रमासाठी मॅनेजिंग पार्टनर म्हणून मी वेल्थ कंपनीत सामील झालो आणि आता वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com