म्युच्युअल फंड : ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय?

आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घेऊन शेअर, डेट आणि सोन्यासारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक विभागण्याला ॲसेट ॲलोकेशन म्हणतात. योग्य मालमत्ता वाटपामुळे जोखीम कमी होऊन दीर्घकालीन परतावा संतुलित ठेवण्यास मदत होते.
What is asset allocation in mutual funds benefits of equity debt gold allocation and hybrid fund investment strategy

What is asset allocation in mutual funds benefits of equity debt gold allocation and hybrid fund investment strategy

Sakal

Updated on

वैभव कुलकर्णी,‘ॲम्फी’ नोंदणीकृत, म्युच्युअल फंड वितरक

ॲसेट ॲलोकेशन अर्थात मालमत्तेचे वाटप म्हणजे तुमची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहनशीलता आणि गुंतवणुकीचा कालावधी यांवर आधारित, तुमची गुंतवणूक शेअर (इक्विटी), रोखे (डेट) किंवा सोने/चांदी (कमोडिटी) यांसारख्या विविध मालमत्तावर्गांमध्ये विभागण्याचे एक धोरण आहे. याचा मुख्य उद्देश गुंतवणुकीत विविधता आणून जोखीम आणि परतावा यांच्यात संतुलन साधणे हा आहे. प्रत्येक मालमत्तावर्ग बाजाराच्या परिस्थितीला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे, त्यांचे मिश्रण गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमधील एकूण जोखीम कमी करण्यास मदत करू शकते. गुंतवणुकीत वाढीसाठी ६० टक्के शेअर, स्थिरतेसाठी ३० टक्के रोखे व अनिश्चिततेपासून संरक्षणासाठी १० टक्के सोने अशी विभागणी केली, तर एखाद्या पाककृतीतील घटकांप्रमाणेच, ही प्रत्येक मालमत्ता महत्त्वाची भूमिका बजावते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com