PM Modi Salary : पंतप्रधानांना देखील भरावा लागतो टॅक्स? कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री यांच्या पगारामध्ये नेमका फरक काय

Modi Cabinet Ministers salary : प्रत्येक सदस्याला आपला आयकर भरावा लागतो तसाच पंतप्रधान, राष्ट्रपती राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना देखील कर भरावा लागतो.
pm modi salary tax
pm modi salary tax

मनोज साळवे

Narendra Modi Cabinet 2024 :

काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एनडीए सरकारमधील ७१ नेत्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू याच्यांकडून मंत्री पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत एक नवा विक्रम केला आहे. या नवनिर्वाचित मंत्र्यांचे सर्वांकडून स्वागत करण्यात आलं आहे.

पण तुम्हाला माहित आहे का ? मंत्रीपद, राज्यमंत्री प्रभारी आणि राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यासाठी किती भत्ता दिला जातो? आणि या तिन्ही पदामध्ये नेमका फरक काय ?

नुकताच एनडीए सरकार शपथविधी सोहळा पार पडला. त्यामध्ये ३० कॅबिनेट तसेच ५ स्वतंत्र कारभार असणारे राज्यमंत्री व ३६ राज्यमंत्र्याना शपथ देण्यात आली. तसेच येत्या काही दिवसातच पूर्ण मंत्रीपदाचा विस्तार केला जाणार आहे. एनडीए सरकारकडून अनेक नवनिर्वाचित खासदारांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.

कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यातील प्रत्येक व्यक्तीला भारत सरकारकडून भत्ता दिली जातो. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पदानुसार मानधन दिले जाते.

कॅबिनेट, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि राज्यमंत्री याच्यात नेमका फरक काय ?

कॅबिनेट मंत्री

कॅबिनेट मंत्री हा केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या श्रेणीचा मंत्री असतो, दुसऱ्या श्रेणीवर राज्यमंत्री असतात ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असतो. याशिवाय आणखी एका श्रेणीतील राज्यमंत्री असतात, ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार नसतो, राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली देखील काम करु शकतात एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या हाताखाली एकापेक्षा अधिक राज्यमंत्री असू शकतात.

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

स्वतंत्र प्रभार असणाऱ्या राज्यमंत्र्यांकडे त्या त्या क्षेत्रातील कामासंदर्भातील आवश्यक असे सर्व हक्क असतात. त्यांच्या कामाचा अहवाल कॅबिनेट मंत्र्यांकडे देणं त्यांना बंधनकारक नसतं. मात्र हे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी होऊ शकत नाहीत.

राज्यमंत्री:

राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला मदत करण्यासाठी बनवले जातात. मंत्रालयात एकापेक्षा जास्त राज्यमंत्र्यांची नियुक्ती होते. कॅबिनेट मंत्र्याच्या अनुपस्थितीत मंत्रालयाची संपूर्ण जबाबदारी राज्यमंत्र्यांवर असते. राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत.

pm modi salary tax
PM Narendra Modi Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात मोदींच्या जॅकेटची चर्चा, 'हे' आहे खास कारण

मंत्रीपद मिळताच मिळतो ‘या’ सुविधांचा लाभ

अगदी ग्रामपंचायत संरपंच असेल तरी त्याला मासिक भत्ता सरकारकडून दिला जातो. पण मंत्र्यांना त्यांच्या तुलनेत अधिक मानधन दिलं जात. गेल्या काही दिवसांपासून भत्याच्या वाढिमध्ये बदल देखील करण्यात आले आहे.

कोणत्या मंत्र्यांना किती वेतन ?

लोकसभेच्या प्रत्येक सदस्याला दरमहा मानधन दिलं जात. त्यामध्ये लोकसभा खासदाराला दरमहिन्याला २.30 ला रुपए भत्ता दिला जातो. तसेच कॅबिनेट पद मिळालेल्या मंत्र्यांना २.३२ लाख रुपए, त्याखालोखाल राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांना 2.31 लाख रुपये आणि राज्यमंत्र्यांना 2,30,600 रुपये मिळतात. पंतप्रधानांना देखील दरमहा २.३३ लाख रुपए भत्ता दिला जातो.

कर भरावा लागतो का?

प्रत्येक सदस्याला आपला आयकर भरावा लागतो तसाच पंतप्रधान, राष्ट्रपती राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना देखील कर भरावा लागतो. विशेष म्हणजे यासर्वांना मिळणाऱ्या पगारावरचा आयकर भरला जातो. इतर मिळणाऱ्या भत्यावर कोणत्याही आयकर आकारला जात नाही.

याशिवाय संसदेचे अधिवेशन सुरू दैनंदिन भत्ताही मिळतो. निवडून आलेल्या सदस्यांना फोन बिल, टपाल, संगणक, चालक अशा अन्य सुविधांसाठीही हे भत्ते दिले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com