

प्रमोद पुराणिक
pramodpuranik5@gmail.com
देशात धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे शेअर बाजारात पर्यटन या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअरची नोंदणीदेखील वाढेल. वेगवेगळे म्युच्युअल फंड या निर्देशांकावर आधारलेल्या योजना आणण्यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे त्यांचीही संख्या वाढेल. पर्यटन क्षेत्र वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय वैयक्तिक स्वरूपातील, भागीदारी संस्था, खासगी कंपन्या जास्त आहेत, त्यामुळे या क्षेत्राचे बाजार मूल्यांकनही हळूहळू वाढेल. थोडक्यात, निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स हा उद्याचा निर्देशांक आहे.