

Understanding Plutonomy: An Economy Driven by the Ultra-Wealthy
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
प्लुटोनॉमी अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे अर्थव्यवस्थेतील बहुतांश संपत्ती मोजक्या श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रित असते आणि त्या अर्थव्यवस्थेची वाढ प्रामुख्याने अशा लोकांचे खर्च आणि गुंतवणूक यावर अवलंबून असते. थोडक्यात, असे मूठभर लोकच अर्थव्यवस्थेची दिशा ठरवतात. ही अर्थव्यवस्था चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अलीकडेच ‘नाइट फ्रँक’ या लंडन येथील जागतिक मालमत्ता सल्लागार संस्थेने प्रसिद्ध केलेला अहवाल. या अहवालाने जागतिक पातळीवर होत असलेल्या आर्थिक बदलांची जाणीव करून दिली आहे.