

Household Budgeting Tips for Women: महिला दिन आला की सगळीकडे स्त्रीशक्ती, समानता, स्वावलंबन याबद्दल चर्चा होते. पण एक विषय अनेक घरांमध्ये शांतपणे बाजूला राहतो, तो म्हणजे घरातील आर्थिक व्यवहार. आजही अनेक घरांमध्ये पैशांच्या बाबतीत स्त्रिया थोड्या दूर राहतात. काही वेळा त्यांना त्या गोष्टीत सहभागी होऊ दिले जात नाही, तर काही वेळा त्या स्वतःच त्यात फारसे लक्ष घालत नाहीत.
घरातील आर्थिक व्यवहार पुरुषांच्या हाती असणे हे अनेक वर्षांच्या सामाजिक सवयींमुळे घडत गेले आहे. सध्याच्या अनेक कुटुंबात महिला आर्थिक बाजू सांभाळत असल्याचे चित्र असले तरी अजूनही अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक जबाबदारी पूर्णपणे पुरुषांकडे असते. प्रश्न असा आहे, हे नेमके का घडते? त्यामागे काही ठराविक कारणे दिसून येतात.