
किरांग गांधी
kirang.gandhi@gmail.com
भारतीय शेअर बाजारात इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) योजनांकडे सुवर्णसंधी म्हणून पाहिले जाते. दरवर्षी अनेक ‘आयपीओ’ येत असतात. वर्ष २०२४-२५ मध्येदेखील अनेक ‘आयपीओ’ दाखल झाले. मात्र, त्यात अयशस्वी आयपीओ होण्याचे प्रमाण मोठे आहे. काहींचे शेअर नोंदणीच्या दिवशीच कोसळले, तर काही नंतर लवकरच कोसळले. या पार्श्वभूमीवर, ‘आयपीओं’च्या अपयशामागील खऱ्या कारणांचा शोध घेऊन मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न...
प्राथमिक समभाग विक्री योजनांमध्ये (आयपीओ) गुंतवणूक करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. गुंतवणुकीची सहजता, जलद लाभ मिळण्याची अपेक्षा यामुळे अनेक गुंतवणूकदार ‘आयपीओं’मध्ये आवर्जून गुंतवणूक करतात. याकडे ते एक सुवर्णसंधी म्हणून पाहतात. यंदा मात्र, अनेक बड्या आयपीओंनी गुंतवणूकदारांची निराशा केली.