
How Indian Women Are Driving Growth Through Saving and Investing
सुवर्णा बेडेकर
suvarnabedekar@gmail.com
आज ज्या वेळी महिला गुंतवणूकदारांची लखलखती कामगिरी आणि त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे चढते आलेख पाहिले, की या अर्ध्या लोकसंख्येला आत्मनिर्भरता, महत्त्वाकांक्षा या शब्दांचा सखोल अर्थ २५ वर्षांपूर्वी समजला असता, तर त्यांनी या सरत्या पावशतकामध्ये देशाला एका विक्रमी उंचीवर नक्कीच नेऊन ठेवले असते, असे प्रकर्षाने मनात येते. महिलांचा आर्थिक क्षेत्रातील वाढता सहभाग अर्थचक्राला गती देणाऱ्या धनवंती ठरवत आहे.