अर्थबोध : जिच्या हाती गुंतवणुकीची दोरी ...

म्युच्युअल फंड, एसआयपी आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे महिलांची गुंतवणूक तिपटीने वाढली; आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच दीर्घकालीन नियोजनाची नवी जाणीव
Indian woman managing her investments digitally through a smartphone, symbolising the growing participation of women in mutual funds and SIP investments.

Indian woman managing her investments digitally through a smartphone, symbolising the growing participation of women in mutual funds and SIP investments.

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

भारतातील महिलांचा आर्थिक क्षेत्रातील सहभाग गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला असून, आता त्या केवळ बचत करणाऱ्या नव्हे, तर नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या सक्षम गुंतवणूकदार म्हणून पुढे येत आहेत. याचे एक बोलके उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडातील भारतीय महिलांची वाढलेली गुंतवणूक. गेल्या पाच वर्षांत ही गुंतवणूक तिपटीपेक्षा अधिक वाढल्याचे अलीकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महिलांच्या वाढत्या आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच डिजिटल गुंतवणूक पर्यायांचा वाढता वापर व दीर्घकालीन गुंतवणुकीविषयी जागरूकता ही या बदलामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com