

mutual fund investment
esakal
दीपाली मुजुमदार - deepalimujumdar@gmail.com
भिशी हा अनेक महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी छोटी-मोठी कामे करणाऱ्या महिला असोत, की नोकरदार महिला असोत, एखाद्या तरी भिशीत त्यांचा सहभाग असतो. सोसायटीमधील महिलावर्ग, नातेवाईकांचा गट, कार्यालयातील सहकारी महिलांचा गट अशा वेगवेगळ्या गटांची भिशी असते. भिशीमध्ये जमा झालेली सर्व रक्कम लॉटरी पद्धतीने निवडलेल्या एका महिलेला दिली जाते. त्यामुळे एखादा मोठा खर्च करणे शक्य होते, त्यामुळे महिलांमध्ये भिशी हा प्रकार लोकप्रिय आहे.