
प्रसाद घारे, prasad.ghare@gmail.com
There is an unlimited amount of Opportunity if you are ready. हे इंग्रजी वाक्य प्रत्यक्ष कृतीत आणणारा एक उमदा उद्योजक म्हणजे ध्रुव पाकणीकर. पक्का पुणेकर म्हणून ओळख सांगणाऱ्या या तरुणाने अतिशय कमी कालावधीत ‘इम्पॅक्ट डिझाइन’ या क्षेत्रात जागतिक पातळीवर आपली वेगळी नाममुद्रा निर्माण केली आहे. अनेक जगविख्यात कंपन्यांबरोबर ध्रुवची ‘डॉमिनिक्स ग्लोबल डिझाइन प्रा. लि.’ ही कंपनी प्रत्यक्ष काम करते.