दिव्यांग अमितची भरारी

जन्मतः सेलेब्रल पार्सी असलेल्या अमित बाहेतीने त्यावर मात करून जगण्याची नवी उमेद निर्माण केली. विशेष म्हणजे अमित आज शेअर बाजारात भरारी घेऊन छाप पाडत आहे. ‘आधार’ संस्थेच्या माध्यमातून ''गोशाळा'' चालवून नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
दिव्यांग अमितची भरारी
दिव्यांग अमितची भरारीsakal

जन्मतः सेलेब्रल पार्सी असलेल्या अमित बाहेतीने त्यावर मात करून जगण्याची नवी उमेद निर्माण केली. विशेष म्हणजे अमित आज शेअर बाजारात भरारी घेऊन छाप पाडत आहे. ‘आधार’ संस्थेच्या माध्यमातून ''गोशाळा'' चालवून नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

- राजेंद्र दिघे, मालेगाव

जन्मापासूनच घरात कधी न बघितलेली व ऐकलेली समस्या,अमितचे पूर्ण हात-पाय अधू होते. त्याला बोलता येत नव्हते. आपण बोललेले त्याला काहीच समजत नव्हते. कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. कोणत्याही उद्दीपकाला प्रतिसाद नाही. १९९२ मध्ये या समस्याबाबत तज्ज्ञांनाच कल्पना नसल्याने निश्चित उपचार करतांना खूप समस्यांचा सामना करावा लागला. कुटुंब व मित्र परिवार भक्कम असल्याने अमितच्या उपाचारासाठीचे नवनवीन सेंटर बघण्यास सुरुवात झाली.

मुंबई, पुणे, कोलकता हैद्राबाद, दिल्ली, उदयपूर या भारतातील नामांकित सर्व सेंटरचे उपचार सुरू झाले. दहा वर्षात मोठमोठी १८ ऑपरेशन झाले. एवढे करूनही सर्वांचे एकच उत्तर, अमितचे अपंगत्व कठीण असून तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. परिणामी समाजाकडून येणारी नकारात्मकता त्याला खूप खच्चीकरण करायची. एक ना एक दिवस आशेचा किरण उजाडेल या अपेक्षेने आई वडील प्रयत्न करत होते.

अमितच्या थेरपी व विशेष शिक्षणाचा पाया मजबूत रचता आला नाही. अखेर वाई अक्षर इन्स्टिट्‌यूट बॅचचे स्पेशल एज्युकेटर गोकुळ देवरे यांचा संपर्क झाला. अमितचे अपंगत्व, त्याला आवश्यक असणाऱ्या थेरपी, स्पेशल एज्युकेशन पद्धती स्पीच, फिजिओ व अक्यूपेशनल थेरपीची सुरवात झाली. देवरे व त्यांच्या पत्नी वैशाली यांनी गतिमंद व मुलांचा सांभाळ पालकांनी कसा करावा यासाठी आदर्शवत उदाहरण मालेगाव असावे म्हणून भावेश भामरे, तुषार बछाव या गतिमंदाना दत्तक घेतले. स्वतःच्या घरात विशेष शिक्षणाची सुरवात झाली. त्यावेळी त्यांचा मोठा चिरंजीव नचिकेत हा अडीच वर्षाचा होता तर लहान चिरंजीव पार्थ चार महिन्याचा होता. त्यांचा सांभाळ व डेव्हलपमेंट बघून अमितला कसे सांभाळावे त्याचे पुनर्वसन कसे करावे हे बाहेती परिवाराच्या लक्षात आले. त्यानुसार घरातच अमितचे विशेष शिक्षण सुरू झाले.

देवरे दाम्पत्याने विशेष आधार मतिमंद मुलांची शाळा सुरू केली. अमितचा प्रवेश झाला. शाळेचा बदल नैसर्गिक शिक्षण पद्धतीत केला. अमितसह इतर मुलांना साहित्य साधने उपलब्ध करून दिली. अमितला ज्या वैयक्तिक विशेष सेवा सुविधा मिळणे अपेक्षित होते त्या सर्व वेळेत सुरू झाल्या. वैयक्तिक विशेष शिक्षक मिळाल्याने बौद्धिक पातळी लक्षात घेता विशेष शिक्षण व थेरपी मिळाल्या. तो हळूहळू बोलू लागला. कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला. कालांतराने अमितची विलक्षण प्रगती झाली.

नेचरल स्टिम्युलेशन थेरपी या पद्धतींचा अमितला फायदा झाला. आज क्रिकेटबाबत सामान्य ज्ञान हवे असल्यास सर्व जण अमितला फोन करून माहिती घेतात. सध्या तो शेअर्स मार्केटचा व्यवसाय करत आहे. अमित हा एक हजार देशी गीर गायींच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भागिदारची भूमिका पार पाडत आहे. अमितच्या या यशाबद्दल अनेक संस्थांनी गौरव केला आहे. सेरेब्रल पालसी असोसिएशनतर्फे अमितच्या धाडसाचे आणि जिद्दीचे कौतुक करण्यात आले. मुंबई विद्यापीठ येथे अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते इम्पॉवर ॲबिलीटी एक्सलन्स रत्नश्री पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. समाज व ''आधार'' यामुळे ही भरारी घेता आल्याचे आई वडिलांनी सांगितले.

अमितच्या बाबतीत ‘आधार’ आणि परिवारातील सदस्य यांनी दिलेली साथ यामुळे अमितची वाट प्रकाशमान झाली. अमित स्वतः दिव्यांग असून त्याच्यातील प्रगतीचा आज अभिमान आहे. अमितचे क्रिकेटप्रेमासह गोशाळा व्यावसायिकता व शेअर बाजारातील भरारी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

- ओमप्रकाश बाहेती, अमितचे वडील

प्रेरणादायी हातांची गाथा

माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com