गट मायक्रोबायोम - मानवाचा साथीदार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

microbiome

‘गट मायक्रोबायोम’ हा वैद्यकीय विश्वात ऐकायला मिळणारा बहुचर्चित शब्द आहे. लहान मुलांना अथवा मोठ्यांना पोटाच्या व्याधी झाल्यावर ‘प्रोबायोटिक’ प्रकारचे औषध सर्रास दिले जाते.

गट मायक्रोबायोम - मानवाचा साथीदार!

‘गट मायक्रोबायोम’ हा वैद्यकीय विश्वात ऐकायला मिळणारा बहुचर्चित शब्द आहे. लहान मुलांना अथवा मोठ्यांना पोटाच्या व्याधी झाल्यावर ‘प्रोबायोटिक’ प्रकारचे औषध सर्रास दिले जाते. या प्रोबायोटिकचे काम पोटातील गट मायक्रोबायोम पुन्हा भरून काढणे आहे. गट मायक्रोबायोम म्हणजे नक्की काय, ते काय करतात व त्याचे महत्त्व काय याची माहिती...

मानवी आतड्यात अब्जावधी सूक्ष्मजीव असतात व याला गट मायक्रोबायोम असे म्हणतात. हे सूक्ष्मजंतू प्रामुख्याने मानवाच्या मोठ्या आतड्यात असतात, मात्र ते त्वचेवर, अनुनासिक मार्गावर आणि शरीराच्या अनेक भागांवर देखील सापडतात. मानवी मायक्रोबायोम प्रकल्प (HMP) हा मानवी आरोग्य आणि रोगाशी संबंधित मायक्रोबायोमबद्दलची समज वाढवण्यासाठी अमेरिकेमध्ये केलेला संशोधन उपक्रम होता. या २००७मध्ये केलेल्या प्रकल्पास १७ कोटी डॉलर खर्च आला होता. गट मायक्रोबायोम शरीरात व शरीरावर राहणारा मानवाचा पहिला ‘खरा’ साथीदार. एकूणच, या सूक्ष्मजीवांचे एकत्रित वजन अंदाजे २-५ पौंड (१-२ किलो) असू शकते. एकत्रितपणे, ते आपल्या शरीरातील अतिरिक्त अवयव म्हणून कार्य करतात आणि आपल्या आरोग्यामध्ये मोठी भूमिका बजावतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इतकेच काय, मानवी आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये १,०००पेक्षा जास्त प्रकारचा जीवाणूंच्या प्रजाती आहेत व त्यापैकी बहुतेक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर इतर काही बाधक.

फायदे आणि तोटेही

प्रत्येक व्यक्तीमध्ये मायक्रोबायोटा (म्हणजे मायक्रोबायोमचा एकत्रित संच) वेगवेगळा असतो. प्रत्येक जण जन्माच्या वेळी आणि आईच्या दुधाद्वारे प्रथम सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येते. काही जिवाणू प्रथम बाळांच्या आतड्यांमध्ये वाढू लागतात, त्यांना बिफिडोबॅक्टेरिया म्हणतात. कालांतरानंतर, पर्यावरण आणि आहाराप्रमाणे एखाद्याचे मायक्रोबायोम बदलू शकतात. बहुतेक मायक्रोबायोम सिम्बायोटिक असतात (म्हणजे जेथे मानवी शरीर आणि मायक्रोबायोटा दोघांनाही एकमेकांचा फायदा होतो) आणि काही, कमी संख्येत, रोगजनक (रोगाला चालना देणारे) असतात. हे मायक्रोबायोम जास्त प्रमाणात आतड्यातील न पचलेले अन्न व फायबरला पचून आपले अन्न मिळवतात.

गट मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यासाठी...

  • अँटिबायोटिकच्या अतिसेवनामुळे गट मायक्रोबायोमवर विपरीत परिणाम होतात. त्यांचे संतुलन ढासळते व त्याचे विपरीत परिणाम दिसतात. त्यामुळे गरज नसताना अँटीबायोटिकचे सेवन टाळावे.

  • फळे आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे उपयुक्त फायबर असतात. वेगवेळ्या प्रकारचे फळे आणि भाज्या खाणे उपयुक्त ठरते. त्यामध्ये विविधता ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

  • आंबवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये (दही, इडली वगैरेमध्ये) असणारे लैक्टोबॅसिलीसारखे जीवाणू फायदेशीर ठरू शकतात.

  • ओटीसी म्हणजे मेडिकलमध्ये मिळणारे प्रोबायोटिक्स नेहमीच आवश्यक नसतात, परंतु ते निरोगी गट मायक्रोबायोम पुनर्संचयित करण्यात मदत करतात व ते डॉक्टरचा सल्ल्याने घ्यावे.

  • साखरेचे अतिसेवन करणे, प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे.

रोगप्रतिकारक पेशींशी संवाद

  • प्रतिकार शक्ती - मायक्रोबायोम तुमची रोगप्रतिकार प्रणाली कशी कार्य करते, हे देखील नियंत्रित करते. रोगप्रतिकारक पेशींशी संवाद साधून, मायक्रोबायोम आपले शरीर संसर्गास कसा प्रतिसाद देते हे नियंत्रित करू शकतो व काही रोगांमध्ये दाह कमी जास्त करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.

  • मेंदूच्या आरोग्यावर नियंत्रण - लाखो मज्जातंतूंद्वारे आपली पचनसंस्था शारीरिकदृष्ट्या मेंदूशी जोडलेली असतात. नवीन संशोधनानुसार, मायक्रोबायोम मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतो, जे मेंदूचे कार्य नियंत्रित करते. शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे, की मेंदूतील ‘सेरोटोनिन’, म्हणजे माणसाला आनंदी ठेवणाऱ्या रसायनाची पातळी आतड्यांतील जीवाणूंना मोठ्या प्रमाणात नियंत्रित ठेवतात.

  • वजन असंतुलित ठेवणे - निरोगी आणि लठ्ठ लोकांच्या मायक्रोबायोममध्ये फरक असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. माक्रोबायोमचा वजन संतुलन व चायापचयावर थेट परिणाम होतो

  • हृदयाचे आरोग्य - फायदेशीर मायक्रोबायोमची पातळी थेट शरीरात असणाऱ्या घटक ‘LPS’ नावाच्या घटक द्रव्याशी संबंधित असू शकतो व कोलेस्टेरॉलशी ही संबंधित असतो.

Web Title: Abhishek Dhawan Writes Group Microbiome

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top