
सु. ल. खुटवड
आचार्य अत्रे यांचे कट्टर विरोधक व थोर कादंबरीकार ना. सी. फडके यांनी म्हटले आहे, की अफाट, अचाट- अघटित-अद्वितीय व असाधारण असे व्यक्तिमत्त्व म्हणजे अत्रे. काँग्रेसचे नेते काकासाहेब गाडगीळ असे म्हणतात, की ‘लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर चतुरस्र, लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणजे अत्रे होय. नेतृत्व आणि कर्तृत्व लाभलेले आचार्य अत्रे हे लोकमान्य टिळकांचे एकमेव वारसदार ठरतात.’