

Linguistic Power: Advocate Abhidha Nifade Decodes Gender-Based Speech Barriers
Sakal
अॅड. अभिधा निफाडे
काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्याबद्दलचा एक किस्सा खूप चर्चेत आला होता. दोघं एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना त्या हॉटेलचा मालक मिशेल यांचा जुना मित्र निघाला. त्यावर बराक ओबामा मिस्कीलपणे मिशेलला म्हणाले, ‘‘मिशेल, बघ, तू याच्याशी लग्न केलं असतंस, तर आज या हॉटेलची मालकीण असतीस.’’ मिशेल यांनी त्यावर शांतपणे उत्तर दिलं, ‘‘नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं, तर तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला असता.’’