agitation for calcutta doctor rape and murdersakal
संपादकीय
भाष्य : एक डॉक्टर की मौत
कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या घटनेने (नऊ ऑगस्ट) देशभर संताप व्यक्त होतो आहे. वैद्यकीय क्षेत्राला या घटनेने अधिक असुरक्षित वाटू लागले आहे.
कोलकाता येथे घडलेल्या बलात्कार व खुनाच्या प्रकरणाने एकूणच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर समोर आलाच; परंतु वैद्यकीय क्षेत्रातील अस्वस्थता व डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.
कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या घटनेने (नऊ ऑगस्ट) देशभर संताप व्यक्त होतो आहे. वैद्यकीय क्षेत्राला या घटनेने अधिक असुरक्षित वाटू लागले आहे व देशात सगळीकडे वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर या घटनेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राक्षसी अत्याचारांचे लक्ष्य ठरलेली मुलगी डॉक्टर होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर येणे साहजिक आहे.