नअस्कार! ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं वातावरण आत्तापासूनच तापायला लागलं आहे. जोरदार बैठकांवर बैठका झडत असल्याची कुणकूण कानावर आहे. बैठका आल्या की जेवणं आलीच..जेवल्याशिवाय बैठक कशी होणार? पण परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली साहित्य महामंडळाची बैठक जेवणाविनाच उभ्या उभ्या पार पडली. या उभ्या उभ्या बैठकीतच ‘देवेंद्रजींनी संमेलनाला लागेल ते सगळं सहकार्य करु’ असं आश्वासन दिल्यानं तयारीला आता विलक्षण गती येईल असं दिसतंय. जेवा, जेवा!.एकंदरीत साताऱ्याचं संमेलन दणक्यात होणार, अशी चिन्हं आत्तापासूनच दिसायला लागली आहेत. आगामी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार, हे आधी ठरलं होतंच. पण आता एकेक गोष्टी मार्गाला लागत असल्यानं मंडळ उत्साहात आलंय, असं दिसतं.त्यात स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले यांचीच (ठरवल्याप्रमाणे) निवड झाल्यानं सगळं काही बैजवार होणार, याचीही खात्री पटली आहे. शिवेंद्रराजे ९९ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, तर त्यांचे पिताश्री अभयसिंहराजे हे १९९३ मध्ये साताऱ्यातच झालेल्या ६६व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पिता-पुत्र दोघेही स्वागताध्यक्ष होण्याची संमेलनाच्या इतिहासातली एकमेव ‘लिटररी केस’ आहे..नाटककार, पत्रकार, लेखक विद्याधरअण्णा गोखले तेव्हा संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. कोणेएकेकाळी संमेलनाध्यक्ष निवडणुकीतून निवडून यायचा. आता बैठकीतून एकमतानं निवडला जातो. साताऱ्यात कोण अध्यक्षपदी असेल हे ठरायचंय, पण तेव्हा विद्याधरअण्णांनी मर्ढेकरांच्या प्रस्तावित स्मारकापासून मराठी भाषेच्या शुद्धाशुद्धतेपर्यंत अनेक विषयांना धसास लावण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी मराठी भाषेला हिंदीशी झुंजवलं जातंय. त्याचे पडसाद साहित्य संमेलनात उमटायला हवेत. भाषेच्या शुद्धाशुद्धेतेपासून हिंदीबद्धतेपर्यंत मायमराठीचा प्रवास झाला आहे. ६६ ते ९९ या ३२ वर्षात (की ३३?) मराठी भाषा इथवर येऊन कोसळली. याला काय म्हणायचं? साताऱ्यात शिवेंद्रराजेंनी आपली सगळी टीमच्या टीम परवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे भेटीसाठी नेली..फडणवीसांनी ‘डोण्ट वरी’ असं मराठीत सांगून टाकलंय, म्हणजे संमेलनाच्या मांडवात मुख्यमंत्र्यांचा फौजफाटा दिसणार हे उघड आहे. शिवाय हे संमेलन घडतंय साताऱ्यात, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांची शिबंदी घेऊन उतरणार! बारामती काही फार लांब नाही, त्यामुळे अजितदादांच्या गोटातले लोकही दिसणार! एकंदरीत साताऱ्याची तऱ्हा पोलिटिकल होणार नाही ना, अशी चिंता भेडसावतेय.आणीबाणीच्या विषकालाच्या प्रारंभीची गोष्ट. साल होतं १९७५. कराडला संमेलन होतं. अध्यक्षपदी होत्या दुर्गाबाई भागवत. संमेलनाध्यक्ष साक्षात यशवंतराव चव्हाण होते. याच संमेलनात जबरदस्त वाद उफाळला होता. राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यावंच का? असा सवाल उपस्थित झाला होता. तेव्हा संयमी यशवंतरावांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं : ‘…मित्र हो, माझे भाषण संपले आहे. आता फक्त शेवट..प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेशात जात असत. तसेच या शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी – भाकरीचा असला, तरी तो भावमिश्रीत आहे. जिव्हाळ्याचा आहे. सकस आहे, हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करुन घ्यावा.’…यशवंतराव जे बोलले, ते मार्गदर्शक तत्त्वापेक्षा काही कमी नाही. संबंधितांनी योग्य तो बोध घ्यावा, येवढंच तूर्त म्हणत्ये. आमच्या साताऱ्यात भाजीभाकरी आहेच, आणि बरंच काही आहे. शिवाय जगप्रसिद्ध मोदींकडले कंदी पेढेसुद्धा आहेत. ६६ ते ९९ फरक तर पडणारच ना!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.