Amar Singh Chamkila Movie : चमकिला, कॅनडा आणि पुढील धोके

आजच्या लेखाचा विषय हा उपरोक्त चित्रपटाविषयी केवळ भाष्य करण्याचा नसून त्या निमित्ताने पंजाबमधील तत्कालीन आणि आत्ताची परिस्थिती तसेच पुढे येऊ घातलेल्या धोक्यांविषयी चर्चा करण्याचा आहे. पंजाबमध्ये ८० च्या दशकामध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातलेला होता.
Amar Singh Chamkila Movie
Amar Singh Chamkila Moviesakal

आजच्या लेखाचा विषय हा उपरोक्त चित्रपटाविषयी केवळ भाष्य करण्याचा नसून त्या निमित्ताने पंजाबमधील तत्कालीन आणि आत्ताची परिस्थिती तसेच पुढे येऊ घातलेल्या धोक्यांविषयी चर्चा करण्याचा आहे. पंजाबमध्ये ८० च्या दशकामध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातलेला होता. त्याच कालावधीत तेथील लोकप्रिय गायक अमरसिंह चमकिला यांची ८ मार्च १९८८ रोजी हत्या झाली आणि त्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि हळूहळू वातावरण निवळू लागले. या चित्रपटाने पुन्हा एकदा काही बाबी अधोरेखित केलेल्या आहेत. हा चित्रपट आपल्याला त्या वास्तवाचा आरसा दाखवतो जे विसरण्याकडेच आपला कल असतो किंवा काहींसाठी ते गैरसोयीचे असते त्यामुळे ते त्याकडे सोईस्करपणे काणाडोळा करतात.

पुढील तीन बाबींचा विचार करू...

अमरसिंह चमकिला या चित्रपटात तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करताना अनेक संदर्भ सुटल्याचे जाणवते. तसेच १९८८ मध्ये तेथे सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचे उल्लेखही अगदी त्रोटकपणे येतात...जे त्या चित्रपटाच्या समकालीन संदर्भांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा चित्रपट वास्तवाशी भिडण्याबाबत तटस्थ राहिल्यासारखे वाटते.

दुसरा मुद्दा म्हणजे ही हत्या झाली त्यानंतर दोनच महिन्यांनी म्हणजे नऊ मे १९८८ मध्ये सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांविरोधात ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ राबवण्यात आले. त्यानंतर आजतागायत शिखांच्या या पवित्र मंदिरात एकही दहशतवादी येऊ शकलेला नाही. दहशतवाद्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यात या कालावधीमध्ये यश मिळाले होते.

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हरदीप सिंग निज्जरच्या कथित हत्येप्रकरणी कॅनडाने नुकतेच तीन ‘भारतीय नागरिकांना’ (सर्व पंजाबी, बहुधा शीख) अटक केली आहे. पुन्हा एकदा दहशतवादी कृत्ये घडवून आणत पंजाबमध्ये पुन्हा हिंसा भडकविण्यासाठी कॅनडामध्ये प्रयत्न सुरू आहेत. त्याला समर्थन देणारे अनेकजण तेथे एकत्रित येऊ लागले आहेत. गेल्याच महिन्यात कॅनडाचे पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांनी शिख धर्मियांच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लावल्यामुळे त्याला आणखी बळ मिळते आहे. त्या कार्यक्रमात फुटीरतावादी घोषणा देण्यात आल्या. शिवाय भारताविषयी आक्षेपार्ह भाषाही वापरण्यात आली. तसेच त्याच पद्धतीचे फलकही झळकविण्यात आले.

वरील विषयाच्या संदर्भाने माहितीसाठी, १९८१ आणि १९९३ दरम्यान जेव्हा पंजाबमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाया तीव्र करण्यात आल्या तेव्हा त्यांचे अनेक म्होरके हे कॅनडा आणि ब्रिटनमध्ये पळून गेले होते. तेथे त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे त्यातील अनेकांनी पाकिस्तानचा रस्ता पकडला. आज मात्र फुटीरतेला पाठिंबा दर्शविणारे बहुतेक म्होरके हे कॅनडामध्ये आहेत आणि तेथे त्यांना पूर्ण राजकीय पाठिंबा मिळत आहे.

दुसरा सर्वात महत्त्वाचा फरक असा की, १९८० च्या दशकाप्रमाणे पंजाबमध्ये आता अशा कोणत्याही मोहिमेला कोणत्याच पातळीवर समर्थन दिले जात नाही. येथील सर्व शीख मंदिरे शांततेचा आनंद घेत आहेत हे प्रचंड सकारात्मक आहे. तथापि दुसरीकडे कॅनडामध्ये तेथील मतपेढीच्या राजकारणात भारतविरोधी द्वेष पसरविण्याच्या वृत्तीला खतपाणी घातले जात आहे आणि त्याला संरक्षण दिले जात आहे, हे गंभीर आहे. भारतीय गुप्तचरांना अशा राष्ट्रांमध्ये जाऊन तेथील तथाकथित खलिस्तानी लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी लढावे लागत असेल तर ही बाब चिंतेची आहे. आणि हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे. या सर्व बाबींचा शेवट वाईटच होणार आहे हे नक्की.

निज्जर हत्याप्रकरणातील तीन कथित मारेकरी भारतीय ‘एजन्सी’च्या इशाऱ्यावर काम करत होते, असा दावा कॅनडा पोलिसांनी केला आहे. ज्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे ते विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये आले आहेत, मात्र ते एकही दिवस कोणत्‍याही महाविद्यालयात किंवा शाळेत गेल्याचे दिसलेले नाही. ते भाडोत्री गुंडच आहेत आणि आणखी तीन खुनांमध्ये त्याचे नाव जोडले गेलेले आहे. विशेष म्हणजे तेथे मात्र कोठेही त्यांचा भारतीय एजन्सीसोबत नाव जोडलेले नाही.

कॅनडामध्ये खून होणे आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले होणे या नित्याच्या बाबी झालेल्या आहेत. भारतातील काही माफिया तेथे टोळ्यांद्वारे कार्यरत आहेत. त्यातील अनेकजण तुरुंगात आहेत. उदाहरणार्थ लॉरेन्स बिश्‍नोई (हा गुजरातमध्ये तुरुंगात आहे) आदी. अमलीपदार्थ, बंदुका, बेकायदा मानवी वाहतूक आदींचा तेथे सुळसुळाट आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा अत्यंत ढिलाईने काम करताना दिसते. यांच्याप्रमाणेच अनेक बेरोजगार कॅनडामध्ये सातत्याने माफिया आयात करत असतात.

पंजाबमध्ये त्यासाठीचे एक रॅकेटच कार्यरत आहे. त्यासाठी आवश्‍यक व्हिसा आणि इतर कागदपत्रांची व्यवस्था कशी केली जाते? ‘जी-७’ आणि फाइव्ह आईज’ सदस्य राष्ट्रांची व्हिसा-सुरक्षा ही अत्यंत तकलादू आणि भ्रष्ट आहे. त्यामुळे तेथील प्रवेश अगदी सोपा होऊन जातो. त्यातून अगदी स्वस्तात पंजाबी मजूर तेथे उपलब्ध होतात. खरेच एवढ्या मजुरांची तेथे आवश्‍यकता आहे का की तेथील मतदार वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत? हेही तपासायला हवे. एक मात्र खरे की कॅनडा भारतातून माफियांची आयात करीत आहे. हे माफिया तेथे आपसांत भांडतात आणि त्याचे पडसाद अनेकदा भारतात उमटतात. याचे मोठे उदाहरण म्हणजे गायक सिद्धू मुसावाला याची हत्या.

अमरसिंग चमकिला यांची १९८८ मध्ये वयाच्या २८ व्या हत्या झाली. त्यांचे मूळ नाव धनी राम, ते दलित होते आणि त्यांच्या गायकीतून ते स्टार बनलेले होते. ते कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या गाण्यांतील बोल हे ग्रामीण ढंगाचे होते. त्या काळात राज्यात रोज हत्या होत होत्या आणि तशा परिस्थितीत ते राज्यभर कार्यक्रम करत होते. अमरसिंग यांची हत्या का झाली याचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. त्यांच्या गाण्यांतील बोलामध्ये अश्लीलता भरलेली होती त्यावरून चिडून त्यांना मारले असावे किंवा त्यांच्या लोकप्रियतेमुळे इतर गायकांवर परिणाम झाला असावा, किंवा त्यांनी केलेले लग्न...हे त्यांच्या हत्येचे कारण असू शकते; मात्र याबाबत अद्यापही कोणतेही ठोस कारण पुढे आलेले नाही.

चित्रपटातूनही तसे काहीच ध्वनीत होत नाही आणि येथेच खरे संदर्भ चुकत जातात. असे संदर्भ चुकवणे हे सर्जनशील स्वातंत्र्य नक्कीच नाही. काही बाबी या खरेपणाने आणि ठळकपणे यायलाच हव्यात. विशेष म्हणजे अमरसिंग यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही किंवा कोणाचे नावही पुढे आलेले नाही कारण त्या कालावधीमध्ये एखाद्याची हत्या करणे हा सर्वात सुरक्षित गुन्हा होत होता.

एक मात्र खरे जर त्यांना अश्लीलतेसाठी मारले गेले असेल तर, प्रसिद्ध पुरोगामी कवी पाश (मूळ नाव: अवतार सिंग संधू) यांचीही हत्या चमकिला यांच्या हत्येनंतर दोन आठवड्यांनंतर कशी काय झाली? त्यांच्या कवितेमध्ये नेहमीच समतेचे शब्द असत. अगदीच काही प्रमाणात समतावादी क्रांती डोकावत होती. ‘सब तो खतरनाक हुंडा है सपनें दा मार जाना (‘तुम्ही तुमची स्वप्ने मरू देता...ही तुमच्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट आहे). या अशा गाण्यांसाठी त्यांची हत्या कोणी का बरे केली असेल?

ते कधीकाळी नक्षलवादी कारवायांतही सहभागी होते आणि त्यासाठी त्यांना बराच काळ तुरूंगात ठेवण्यात आले होता. पंजाबमधील हिंसाचाराविरोधात जागृतीसाठी त्यांनी मृत्युपूर्वी परदेश दौराही केला होता. परदेशात ‘अँटी-४७’ चळवळ चालवणाऱ्या गटातही ते सहभागी झाले होते. दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून ‘एके-४७’ पुरविल्या होत्या. ज्या ‘एके ४७’ ने पंजाबमध्ये २५ हजारांवर नागरिक मारले गेले. मात्र त्यांची हत्या कोणी केली हेही काही पुढे आले नाही. पाश आणि चमकिला यांच्या हत्या झाल्या त्यानंतरच्या दोन महिन्यांत जवळपास पाचशे जणांची हत्या झाली, ज्याची संपूर्ण यादी माझ्याकडे आहे. चमकिला यांच्या हत्येपर्यंत सातत्याने हत्याकांडे होतच होती. त्याकडे डोळेझाक करणे हा जरी गुन्हा नसला तरी ते जबाबदारी झटकण्यासारखेच आहे.

ओळखा पुढील धोके...

१९८८ मध्ये पंजाबने आणि तेथील शिखांनी जे सहन केले आहे...त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. ट्रूडो यांच्या कॅनडामधील नागरिकांना आत्ता त्यांच्या देशात शिखांच्या टोळ्या दिसत आहेत. त्यांचा त्यांना त्रास होऊ लागला आहे. तेथील कायदा व्यवस्थेला धक्का लागत आहे. सुरक्षाव्यवस्था घसरली आहे; मात्र त्याला कारणीभूत त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या एकूणच व्यवस्थेमधील त्रुटी आहेत. त्याबाबत वेळीच काळजी न घेतल्यास येत्या काळामध्ये अनेक धोके समोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी एखादी निर्मिती करताना या सर्वांचा साधक-बाधक विचार करणे अपेक्षित आहे.

(अनुवाद : प्रसाद इनामदार)

राष्ट्रहिताच्या नजरेतून

निवडणुकीच्या ऐन भरात नुकताच ‘ओटीटी’वर इम्तियाज अली यांचा ‘अमरसिंग चमकिला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा १९८० च्या दशकातील वास्तव समोर आले. चमकिला यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण पंजाब हादरले, हे जरी खरे असले तरी त्या हत्येपूर्वीही पंजाबमध्ये दिवसाआड कोणाची तरी हत्या होतच होती. याकडे डोळेझाक करणे हा जरी गुन्हा गृहीत धरला गेला नाही तरी ते जबाबदारी झटकण्यासारखेच आहे.

-शेखर गुप्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com