संवादायन : वादमार्ग, परिभाषा, मर्यादा व कालखंड

चरकसंहितेतील ‘वादमार्ग’ संकल्पना, जल्प-वितंडा टाळणारी सम्यक चर्चा, वादमर्यादा व वादस्थल यांचा सुसंगत ऊहापोह
"वाद घालावा पण वितंडा नको!" चरकाचार्यांनी सांगितलेली 'शहाण्या' चर्चेची ४४ सूत्रे; वाचा आजच्या काळातही लागू होणारे संवादशास्त्र.

"वाद घालावा पण वितंडा नको!" चरकाचार्यांनी सांगितलेली 'शहाण्या' चर्चेची ४४ सूत्रे; वाचा आजच्या काळातही लागू होणारे संवादशास्त्र.

Sakal

Updated on

श्रीनिवास हेमाडे

वैदिक न्यायदर्शनाने वाद, जल्प आणि वितंड अशी तीन टप्प्यांत वादपद्धती मांडली. वादी व प्रतिवादी दोघांनी समपातळीवर प्रमाण व तर्क या साधनांच्या मदतीने संयमित चर्चा करणे हा वाद, तर जल्प म्हणजे स्वतः विजयी होण्यासाठी हेकेखोरपणा करून दुसऱ्याला हरवणे, आणि वितंड म्हणजे केवळ शब्दाला शब्द वाढवून बिनमुद्द्याचे निव्वळ भांडण करणे.

आयुर्वेदाचार्य चरक यांनी मात्र ही संकल्पना बदलली. त्यांच्या मते चर्चाविषयाची एक विशिष्ट परिभाषा असते. चर्चेच्या विषयाचे आणि तिच्या परिभाषेचे ज्ञान सर्वांना आहे, असे प्रारंभी गृहीत धरले जाते. तरीही दोन्ही वादी-प्रतिवादी पक्षांना आणि प्रश्न विचारणाऱ्या प्रेक्षकांना मान्य असणारी वादाची परिभाषा पुन्हा नव्याने तयार केली जाते. ही परिभाषा काही संकल्पनांनी बनलेली असते. या संकल्पनांना चरकसंहितेत ‘वादमार्ग’ म्हटले आहे. या संकल्पनांचे सखोल ज्ञान चर्चेतील सर्वांना, विशेषतः शहाण्या चर्चकास असलेच पाहिजे. या ४४ संकल्पना आहेत. १. वाद २. द्रव्य ३. गुण. ४ कर्म. .....४४. निग्रहस्थान. त्यांचा विशिष्ट क्रम असतो, तो बदलावायचा नसतो. या संकल्पनाच्या वर्णनाला ‘वाद परिभाषा’ असे म्हटले आहे. पहिली ‘वाद’ ही संकल्पना चर्चा करण्याची पद्धती म्हणून परिचित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com