लढवय्या शिलेदार

Alexei-Navalny
Alexei-Navalny

‘कोरोना’शी संपूर्ण जग लढत असताना रशियाने सर्वात आधी लस तयार करून तिचे डोस द्यायला सुरवातही केली. ही आशादायी बाब घडत असतानाच रशियात घडलेल्या आणखी एका प्रकाराने साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले. तेथील ‘रशिया ऑफ द फ्यूचर’ या विरोधी पक्षाचे एक नेते ॲलेक्‍सी अँटोलेव्हिच नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आणि ते कोमात गेले. या मागे नेमके कोण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अध्यक्षीय निवडणुकीत उतरल्यामुळे नवाल्नी चर्चेत आले. त्याआधी रशियातील सरकारविरोधी चळवळींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ४४ वर्षांचे उमदे, लढवय्ये व्यक्तिमत्व असलेल्या नवाल्नींचा जन्म रशियातील ओडिंटस्व्होस्की जिल्ह्यातील बुटयान येथे झाला. पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया, फायनान्स विद्यापीठ आणि येल विद्यापीठातून शिक्षण घेतानाच पुतीन यांच्या विरोधातील अनेक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. सरकारच्या विविध धोरणांना विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एका संस्थेची स्थापना करून त्यांनी तिच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले व तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही ते डगमगले नाहीत. २०१६ च्या निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांनी तयारी केली. पण त्यांना निवडणुकीमधून बाद ठरवण्यात आले. तेव्हापासून नवाल्नी सातत्याने सत्ताधारी युनाटेड रशिया पक्षाच्या विरोधात आवाज उठवत आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपले विचार नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी ते ‘नवाल्नी डॉट कॉम’ ही वेबसाईट, तसेच ‘यूट्यूब’ चॅनेलचा उपयोग करतात. त्याचे ३९.९ लाख सभासद आहेत. ‘याले वर्ल्ड फेलो’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्यावर सध्या जर्मनीत उपचार सुरू आहेत. ‘पुतीन ज्यांना सर्वात जास्त घाबरतात...’ असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वर्णन केलेले नवाल्नी सध्या मृत्यूशी झुंजत असलेल्या या लढवय्या शिलेदाराकडे जगाचे लक्ष आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com