प्रेमळ बना, आमचे ‘पाठिराखे’ व्हा!

प्रेमळ बना, आमचे ‘पाठिराखे’ व्हा!

लैंगिकतेविषयीचे काही जणांचे वेगळेपण स्वीकारण्याची मानसिकता अद्यापही तयार झालेली नाही. अशा व्यक्तींना आदराने वागवणे, समजून घेणे आवश्यक आहे.

मी दहा वर्षांची असताना ‘टायटॅनिक’ चित्रपट पाहिला. मला स्वतःला पटवून द्यावे लागले की, मी चित्रपटाचा नायक ‘लिओ’च्या प्रेमात पडले आहे, मात्र माझे त्याच्यावरचे प्रेम टायटॅनिक जहाजाप्रमाणेच बुडून गेले. अनेक वर्षे हे नाकारत होते, मात्र नंतर लक्षात आले की, मी ‘केट’च्या प्रेमात पडले आहे! माझ्या हे लक्षात येत गेले, तसे मला वेड लागले आहे, असेच वाटू लागले. हे गोंधळून, घाबरून टाकणारे होते, कारण त्या वयात अशा ‘क्विअर’बद्दल, समलिंगी संबंधांबद्दल मी ऐकले नव्हते. माझी शाळा एक कॅथोलिक संस्था होती. तिथे समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना थारा मिळणे वा माझ्या प्रश्नावर उपाय सापडणे शक्य नव्हते. ऑनलाईन माहिती घ्यायला सुरवात केली, मात्र तेथेही माझ्यासारख्या लोकांसाठीची ‘एलजीबीटीक्युआयए+’वर माहिती देणारी व टिनएजर्सनी लिहिलेली पाने उपलब्ध नव्हती. शेवटी मीच माझे पान तयार केले! मला आमच्यासारख्यांसाठी सध्याच्या समाजात सुरक्षित जागा निर्माण करायची होती. मी @lgbtmumbai हे पेज वयाच्या सतराव्या वर्षी सुरू केले. मला कोंडल्यासारखे वाटत होते. काही वर्षांपूर्वी तर जवळच्या मित्रांनाही हे सांगणे सुरक्षित नव्हते. त्यामुळे ते पेज सुरू करणे आयुष्य बदलून टाकण्यासारखे होते. नंतर जवळच्या मित्रांनी माझ्यासाठी सुरक्षित विश्व तयार केले. त्यामुळे मला माझ्या कोषातून बाहेर पडणे व आयुष्य ताठ मानेने जगणे शक्य झाले. माझ्या मताचा आदर करणारे निकटचे  मित्र नसते, तर मला सुरक्षित व सहज कधीच वाटले नसते. त्यांनी मी जशी आहे, तसे मला स्वीकारले आणि मला इतर सर्वांप्रमाणे माझे हक्क मिळाले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. हे सर्व मित्र माझे खरे ‘पाठिराखे’ आहेत!

एलजीबीटीक्युआयए+’चा भाग नसलेले, मात्र त्याला पाठिंबा देणारे, त्यांच्या हक्कांचा पुरस्कार करणारे खरे ‘पाठिराखे’ होत.

भारतासारख्या देशात ‘एलजीबीटीक्युआयए+’ असण्याला साधारणपणे पाठिंबा दिला जात नाही. आपण समलिंगी असल्याचे मान्य करणाऱ्यांना जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यांचा अवमान केला जातो, मारहाणही होते. त्याचबरोबर लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली जाण्याचा व बेघर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे समलिंगीच्या अधिकारांचे समर्थक, पाठिराखे होणे आवश्यक आहे, त्याचबरोबर समाजातील प्रत्येकाच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे. अशा प्रकारे पाठिराखे (अलाय) होणे अनेकदा आव्हानात्मक ठरते, कारण तुमचा हेतू चांगला असतो आणि तुमचा कोणत्याही समलिंगी व्यक्तीला दुखावण्याचा उद्देश नसतो. त्यामुळे तुम्ही तुमचे समलिंगी मित्र, कुटुंबीय व इतरांसाठी जबाबदार पाठिराखे होण्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे पाहूया.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसऱ्यावर लैंगिकता लादू नका
तुम्ही अशा परिस्थितीत सापडलात, जेथे तुम्ही दुसर्याच्या लैंगिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करता  तेव्हा स्वतःला बजावा, की हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही त्याला स्वीकारा किंवा तसा विचार करा. कोणालाही तुमच्याप्रमाणे होण्यासाठी जबरदस्ती करू नका. तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल उत्सुकता असू शकते, पण समोरच्या व्यक्तीला व्यक्त होण्याची व तुमच्याशी बोलण्याची संधी द्या. अशाप्रकारे कोणी तुमच्याकडे आल्यास त्याला आदर आणि प्रेम द्या आणि त्याला आहे तसे स्वीकारा.

बचाव करण्याची जबाबदारी
जेव्हा एखादी समलिंग व्यक्ती तुमच्याकडे येते तेव्हा तिचा तुमच्यावर विश्वास असतो व तिला तुमच्या सानिध्यात सुरक्षित वाटत असते. त्यामुळे इतर लोकांपासून त्यांचा बचाव करणे ही तुमची जबाबदारी ठरते. तुम्हाला ज्ञात नसलेल्या लैंगिकतेला अवैध ठरवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक व्यक्ती तिच्या अस्तित्वाचा अर्थ तिच्या पद्धतीने लावते व इतर कोणीही त्याला अवैध ठरवू शकत नाही. मित्र आणि कुटुंबीयांना सांगितले पाहिजे, की, एखाद्याची लैंगिकता चर्चेचा किंवा अफवांचा विषय असू शकत नाही. एखाद्याला व्यक्त होणे अप्रशस्त वाटत असल्यास त्याला तसा आग्रह करु नका.

सर्वांसाठी सुरक्षित स्पेस
समाजात आजही ‘एलजीबीटीक्युआयए+’ म्हणून उघडपणे जगण्याला मान्यता दिली जात नाही. समाजातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित स्पेस तयार करणे, ही पाठिंबा देणाऱ्या सहयोगींची जबाबदारी आहे. समाजात प्रत्येक नागरिकासाठी हक्काची जागा असावी, यादृष्टीने आपण संघर्ष करतो आहे. सर्वांसाठी वैयक्तिक, हक्काची जागा असलेला समाज बनविणे, हेच आपले अंतिम ध्येय नाही का? प्रत्येकाला इतरांप्रमाणेच आपला समान आणि कायदेशीर अधिकार असलेल्या समाजाची निर्मिती, हेच अंतिम उद्दिष्ट आहे. हिंतचिंतक किंवा पाठिराख्यांनी आता पूर्वीपेक्षा अधिक सशक्त होण्याची गरज आहे, कारण त्यांच्यावरच समान आणि कायदेशीर अधिकारासाठी लढणाऱ्या ‘एलजीबीटीक्युआयए+’ आंदोलनाची प्रगती अवंलबून आहे. त्यामुळे, तुम्ही केवळ बंद दाराआड नव्हे, तर जाहीरपणे एलजीबीटीक्युआयए+ व्यक्तीचे समर्थन करायला हवे. तुमच्या पूर्वग्रहांचा धैर्याने सामना करा आणि हेटाळणीपर असलेल्या ‘होमोफोबिक’, ‘क्वीरफोबिक’ किंवा ‘ट्रान्सफोबिक’ शब्द न वापरण्याचा निर्णय घ्या.

 जाहीरपणे पाठिंबा द्या
लोकांना तुम्ही एलजीबीटीक्युआयए+  समुदायाला व व्यक्तींनाही पाठिंबा देता हे समजू द्या. त्यामुळे, समाजातील अशा व्यक्तींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. इतर व्यक्तींचे होमोफोबिक जोक्स किंवा निंदानालस्तीपर शब्दही ऐकून घेऊ नका. लिंग, समागम आणि लैंगिक कल यातील फरक जाणून घेणे ही पाठीराख्यांची जबाबदारी आहे. (किन्से स्पेक्ट्रमनुसार ही व्यक्तीची स्वत:ची अशी ओळख असते.) लिंगओळखही अनेक प्रकारची असू शकते. उदा. ट्रान्सजेंडर, अजेंडर, नॉन-बायनरी, सिस-जेंडर इ.  सहयोगी किंवा पाठिराख्यांची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांनी एलजीबीटीक्युआयए+ व्यक्तीची जागा न व्यापणे. प्रसारमाध्यमे किंवा चित्रपटांतही अशा व्यक्तींना योग्य रीतीने नि आदराने पेश केले जाते आहे, हेही पाहायला हवे.  अशा व्यक्तींना समाजातील सर्वच स्तरांमध्ये लैंगिकतेच्या आधारावर खरीखुरी समानता मिळते आहे ना, हेही पाहावे. ‘इंटरनॅशनल प्राईड मंथ’नंतरचा हा पहिलाच दिवस आहे. चला, एकमेकांप्रती प्रेमळ होऊयात. आमचे पाठीराखे बना. तुमच्याभोवतीच्या एलजीबीटीक्युआयए+ व्यक्तींना पाठिंबा देण्यास सुरवात करा. व्यक्तीचे लिंग किंवा लैंगिक कल कोणताही असो, तुम्ही तिची बाजू घ्या. त्यानंतरच आपण एकेदिवशी इच्छित ठिकाणी पोचण्याची आशा ठेवू शकतो. तुम्हा सर्वांना हॅप्पी प्राईड..आणि हो...कृपया तुमच्या जवळच्या समलिंगी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीच्या मदतनिधीला 
देणगी द्या.

(लेखिका आर्किटेक्टची विद्यार्थिनी असून @lgbtmumbai साठी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com