esakal | कोरोनाचे ग्रहण सुटण्याची आशा
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

कोरोनाचा आजार म्हणजे नक्की काय? ‘एमएमआर’ची लस म्हणजे काय? ही लस कोरोनाला कशी टाळणार? असे अनेक प्रश्न सतत विचारले जातात. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न.
- डॉ. नीलेश गुजर

कोरोनाचे ग्रहण सुटण्याची आशा

sakal_logo
By
डॉ. नीलेश गुजर

प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक
ही लस ९ महिन्यांपुढील कोणताही व्यक्ती घेऊ शकते. गर्भवती महिला, गंभीर रुग्ण, प्रतिकारक्षमता कमी करण्याची औषधे घेणारे रुग्ण (स्टीरॉइड वगैरे) व ज्यांना ह्या लसीची आधी रिऍक्शन आली आहेत, अशा व्यक्ती ही लस घेऊ शकत नाहीत. कुठलीही लस वा इंजेक्शन घेण्यापूर्वी थोडेफार खाल्लेले उत्तम. लसीने काहीना किरकोळ ताप येतो. आपल्याकडे ही लस लहान मुलांना दिली जाते. अमेरिकेत तसेच दक्षिण कोरिया येथे प्रत्येक सैनिकाला ही लस दिली जाते. ही लस घेऊन सर्वांनी आपापली प्रतिकारशक्ती वाढविणे कधीही उत्तम. ही लस बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे तसेच लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांकडे मिळू शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी एक लाभ
अमेरिकेतील ल्यूसियाना स्टेट युनिव्हर्सिटीमधील संशोधकांना आढळले, की ‘एमएमआर’ची लस ही पांढऱ्या पेशींमधील इन्नेट उतींची ताकद वाढविते. ह्या इन्नेट उती शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणू तसेच जीवाणूंना शरीरात घुसल्यावर लगेच संपवून टाकतात. त्यात अजून एक नवीन शोध शास्त्रज्ञांना लागला तो म्हणजे बोन मॅरोमधील पांढऱ्या मायलॉइड पेशींवर होणारा एक वरदान ठरणारा परिणाम. एम एम आर ची लस मायलॉइड दिराईवड सप्रेसर उतींची सायटोकाइन स्टॉर्मला हाताळण्याची क्षमता वाढविते. सायटो स्टॉर्म मध्ये सैरभैर होणाऱ्या पांढऱ्या पेशीचे सैरभैर होण्याचे प्रमाण खूप कमी होते व त्या स्वतःच्या इतर पेशींवर हल्ला करण्याचे प्रमाण खूप कमी होते. अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी ह्या प्रख्यात संस्थेने देखील ह्या लसीच्या उपयुक्ततेविषयी संशोधन केले आहे. ह्या संशोधनानंतर एम एम आर ची उपयुक्तता वाढली.

प्रथम आपण जाणून घेऊया कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारपणाच्या अवस्था. म्हणजे, त्यावर द्यावयाच्या लसीच्या स्वरूपाविषयी जाणून घेता येईल. 

टप्पा 1 - सुरुवातीची अवस्था
फ्लूसारखी लक्षणे - ताप, सर्दी, खोकला, घसा व अंग दुखणे. विषाणूंची संख्या शरीरात वाढत जाते. बरेच रुग्ण या टप्प्यावर बरे होतात. ज्या रोग्यांवर विषाणू जास्त प्रमाणात किंवा जास्त संख्येने हल्ला करतात किंवा ज्यांना अथवा पूर्वीपासून काही व्याधी उदा.मधुमेह, रक्तदाब, कर्करोग याचे रुग्ण पुढील स्टेजमध्ये जातात. 

टप्पा 2 - पल्मोनरी फुप्फुसातील अवस्था
या अवस्थेत लक्षणे श्वसनसंस्थेशी निगडित राहतात. उदा. सारखा खोकला येणे, धाप लागणे, ऑक्सिजनची मात्रा कमी होणे. 

टप्पा 3 - सायटोकाइन स्टॉर्म
याचा अर्थ शरीरात घोंगावणारे वादळ. ह्यास `हायपर इन्फल्मेटरी स्टेज` असे म्हणतात. यात शरीरातील पांढऱ्या पेशी, यकृत, बोन मॅरो हे कोरोना विषाणूचा प्रतिकार करत असताना शरीरात काही बदल घडतात. उदा. पांढऱ्या पेशींची संख्या वाढणे, इंटरल्यूकीनचे प्रमाण वाढणे. यात पांढऱ्या पेशी सैरभैर होताना व स्वतःचे व शरीराचे नुकसान करताना आढळतात. त्यामुळे ह्यातील बदल नुकसानकारक असतात. शेवटी एक एक करत सर्व अवयव निकामी होत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

‘एमएमआर’ची लस
‘एमएमआर’ची लस बनली आहे गोवर, गालफुगी व रुबेलाविरुद्ध. लस म्हणजे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या निरुपद्रवी विषाणूंपासून प्रतिकारशक्ती मिळविण्याची पद्धत. असे आढळून आले की ही लस गोवर, गालफुगी व रुबेलाशिवाय अन्य विषाणूंवरही प्रतिकारशक्ती देते. ह्याला म्हणतात ‘हेटेरोजिनस’ प्रतिकारशक्ती. ही प्रक्रिया विषाणूंविरुद्ध वापरली जाणारी एक प्रतिकाराची पद्धती. टी उती ह्या पांढऱ्या सैनिकी पेशींनी विकसित केलेली ही पद्धती आहे. गोवरच्या विषाणूचे करोना विषाणूशी असणारे साधर्म्य, गोवर व कोरोन विषाणू एकाच रिसेप्टरवर कार्यरत असणे व रुबेला व कोरोना विषाणू यांच्यातील साधर्म्य या बाबी महत्त्वाच्या आहेत. 

रुग्णसंख्येला आळा
एम एम आर ची लस दिलेल्या व्यक्ती स्टेज २ व ३ मध्ये जाण्याची शक्यता कमी असते, असे आढळले आहे. आपल्याकडे अगोदरच आय.सी.यु.बेडची कमतरता आहे. ही लस घेतल्याने गंभीर रुग्ण होण्याचे प्रमाण कमी होईल. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ह्या लसीकडे बघितले जाते. ह्या लसीचा वापर करून ही कोरोना साथ आटोक्यात आणण्यात यश येऊ शकेल, अशी आशा जगभरातल्या शास्त्रज्ञांना आहे. ही लस प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना उदा डायबेटिस, उच्च रक्तदाब, दमा तसेच कॅन्सरच्या रुग्णांना देण्यात यावी, जेणेकरून आपल्या देशातील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होईल. 
 (लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.)

loading image