व्यक्तिनामा : सर्जनशील अन् संवेदनशील

अरुण काकतकर यांच्या निधनाने मराठी दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील सर्जनशील, संवेदनशील आणि मूल्यप्रधान अध्यायाला विराम; नवोदितांना घडवणारा, संस्कार घडविणाऱ्या कार्यक्रमांचा शिल्पकार हरपला
एका सुवर्णकाळाचा अंत! ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड; नवोदितांना संधी देणारा 'परिस' हरपला

एका सुवर्णकाळाचा अंत! ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड; नवोदितांना संधी देणारा 'परिस' हरपला

Sakal

Updated on

महेंद्र सुके

ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कवी आणि लेखक अरुण काकतकर यांच्या निधनाने मराठी दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील समृद्ध, सर्जनशील आणि संवेदनशील अध्यायाचे एक पर्व थांबले आहे. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक अभिरुची घडवणारा एक महत्त्वाचा शिलेदार हरपला आहे. कला माध्यमात झपाटलेपणाने काम करणारी काकतकरांसारखी माणसं त्यांच्या कार्यकाळातले महत्त्वाचे साक्षीदार असतात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिलेल्या घटना-घडामोडींचे विश्वसनीय स्रोत असतात. त्यांचे जगणे हा महत्त्वाचा लेखाजोखा असतो. आज 'डेटा'च्या मागे सर्व जग धावत असताना, कला माध्यमातील माहितीचा खजिना तोंडपाठ असलेले काकतकर यांचे जाणे कलाप्रेमी समाजमनाला रितेपणाची जाणीव करून देणारे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com