
डॉ. बालाजी तांबे
आज आहे आषाढी एकादशी. हिलाच ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हटले जाते. आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशीला हा महोत्सव येतो. या एकादशीच्या दिवशी आपापल्या आराध्याला अभिषेक-पूजा केली जाते. आजचा दिवस केवळ वैष्णवांचाच नाही तर सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. आज चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणूनही आजच्या या एकादशीचे महत्त्व.