दुर्गम भागातील ‘डिजिटल किरण’

आदिवासी वस्ती असलेले पालघर जिल्ह्यातील दुर्मिळ भागातील बरवाडपाडा गाव हरित परिसराने राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.
Barwadpada
Barwadpadasakal

बदलती गावे : बरवाडपाडा

आदिवासी वस्ती असलेले पालघर जिल्ह्यातील दुर्मिळ भागातील बरवाडपाडा गाव हरित परिसराने राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. येथील लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. जव्हार तालुक्यातील व दादरा नगर हवेलीच्या केंद्रशासित प्रदेशाला लागून आहे. डोंगरांचा वेढा असला तरी मात्र सुखसुविधांची कमतरता नसून शहरालादेखील लाजवेल, अशा योजना लोकसहभागातून प्रत्यक्षात उतरवून, कृतिशील उपाय केले आहेत हे या गावाचे विशेष म्हणावे लागेल.

ग्रामदान मंडळाच्या बरवाडपाडा गावात २०० आदिवासी बांधवांची घरे आहेत. प्रामुख्याने या गावात शेती केली जाते यासाठी विविध अत्याधुनिक प्रयोग करून भात, उडीद डाळ, नागली सह अन्य पिकांची लागवड केली आहे. शेतमाल विक्री करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत महिला बचत गट स्थापन केला व वाहन खरेदी केले.

फक्त उत्पादन विक्री नव्हे तर सुलभ बाजारपेठ मिळावी याकरिता स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून येथील कुटुंबियांना अर्थार्जन लाभले आहे. तर बालविवाह होऊ नये, याची दक्षता घेण्यात येते. याकरिता प्रबोधन केले जात आहे. तरुणांना व्यसायाकडे वळता यावे याकरिता शेअर बाजारातील गुंतवणूक त्याचे होणारे फायदे याची माहिती विशद केली जाते; जेणेकरून येथील गावासोबत जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. मोबाईल अतिवापर या गावात दिसून येत नाही तर जुगार खेळणे, व्यसन करणे यापासून हे गाव कोसो मैल दूर आहे.

एकीकडे विजेचा वापर करण्यासाठी येणारे बिल पाहता सौर ऊर्जेसाठी ग्रामसभेत विषय घेऊन ग्रामदान मंडळाकडून प्रयत्न केले आहेत. एकूण २५ पथदिवे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, व्यायामशाळा या सौरऊर्जेवर चालत आहेत. गावात चार सीसीटीव्हीचा पहारा गावात आहे.प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण गावाने हेरून प्लास्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पूर्ण गावात कचरा कुठेही दिसणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डिजिटल अंगणवाडी , शाळा आहे. घराघरांत पिण्याच्या पाण्यासाठी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

पूर्वी या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, मात्र सद्यःस्थितीत विहीर नळ पाणी योजना आहे. टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. शंभर टक्के सहभाग मिळत आला आहे. ग्रामसभेत गावाच्या विकासाबाबत चर्चा सर्वानुमते केली जाते व त्यानंतर योजना राबविण्यात येतात. २०१७-१८ या वर्षात स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला. एकूण १० लाखाची रक्कम मिळाली. त्यातून घरोघरी नळजोडणी करण्यासाठी तीन लाख खर्च केला, असे येथील सरपंच अनिल मौळे यांनी सांगितले. कोरोना संसर्गाने राज्यात हाहाकार केला, त्यावेळी या गावात केवळ एकच व्यक्ती बाधित झाली होती. दुर्गम भागात समज गैरसमज असताना या गावात लसीकरणालादेखील उत्तम प्रतिसाद देण्यात आला.

दुर्गम भागात वसलेले हे गाव असले तरी व्यसनमुक्त , सौरऊर्जा प्रणालीचा वापर ,स्वयंरोजगार , व्यवसाय, डिजिटल यंत्रणा , शैक्षणिक , आरोग्यासह , सुरक्षेच्या उपायोजना प्रगतीच्या दिशेने असून पालघर जिल्ह्याला नव्हे, तर राज्याच्या विकासाला हातभार लावत ग्रामस्थ आदर्श निर्माण करून देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com