व्यक्तिनामा : आकाशापलीकडील स्वप्नांची गोष्ट!

‘आर्टिमिस २’ मोहिमेतून चंद्राच्या अंधाऱ्या भागापर्यंतचा प्रवास, विक्रमी अंतराळभ्रमण, ‘स्पेस प्लंबर’ म्हणून मिळालेलं बिरुद आणि महिलांसाठी नवं आकाश उघडणारी ख्रिस्तिना कोच यांची प्रेरणादायी कहाणी
"आकाशापलीकडचे स्वप्न आणि अथांग जिद्द!" ख्रिस्तिना कोच: चंद्राच्या पलीकडे जाणारी पहिली महिला.

"आकाशापलीकडचे स्वप्न आणि अथांग जिद्द!" ख्रिस्तिना कोच: चंद्राच्या पलीकडे जाणारी पहिली महिला.

Sakal

Updated on

मंजूषा कुलकर्णी

‘आर्टिमिस २’ मोहिमेद्वारे पृथ्वीपासून अंतराळात सर्वांत दूर जात चंद्राच्या अंधाऱ्या भागाला प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम ख्रिस्तिना कोच, रीड वाइजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, आणि कॅनडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन यांनी केला. या मोहिमेदरम्यान चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या भागात ‘ओरायन’ पोहोचले. पृथ्वीपासून एकूण दोन लाख ५२ हजार ७६० मैल अंतरापर्यंत जाण्याचा विक्रमही या यानाने केला. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर सुखरूप परतणाऱ्या पथकातील ख्रिस्तिना कोच पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या. त्यांची कथा ही केवळ अंतराळ गाठण्याची नाही, तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com