Popular Science Calendar
sakal
वैज्ञानिक विचारपद्धती लोकांच्या मनात रुजावी, यासाठी काम करणाऱ्या ‘लोकविज्ञान संघटने’चा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘लोकविज्ञान दिनदर्शिका’. यंदा या दिनदर्शिकेचे सदतीसावे वर्ष आहे. शहरांच्या बकालीकरणाच्या समस्येवर उत्तर शोधणाऱ्या तज्ज्ञांची ओळख हे यंदाच्या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य. शिवाय त्याबरोबर एक सहपुस्तिकाही काढण्यात आली असून त्यात बकालीकरणावर लोकवैज्ञानिक उपाय सांगणाऱ्या तज्ज्ञांच्या लेखांचे संकलन आहे. त्या पुस्तिकेतील हा एक संपादित लेख.