
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘पॉडकास्ट’ सुरू झाला आहे. ‘महाराष्ट्रधर्म’ असे त्याचे नाव. या मासिक पॉडकास्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर महिन्याला एका विषयावर सविस्तर विवेचन करणार आहेत. यापूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय…’ असा कार्यक्रम सुरू केला होता. त्याची सुरुवात धुमधडाक्यात झाली होती. मात्र तो फार अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकला नव्हता.