लघुउद्योग : गरज बदलांना सामोरे जाण्याची 

लघुउद्योग : गरज बदलांना सामोरे जाण्याची 

"कोरोना'मुळे व्यावसायिक गरजा आणि परिस्थितीत कुठले आणि कसे व कितपत बदल झाले आहेत, याचा आढावा घेऊन लघुउद्योगांनी त्यानुसार आपल्या कार्यपद्धतीत आणि प्राधान्यक्रमात बदल करणे गरजेचे आहे. हे आव्हान कठीण असले, तरी अशक्‍य नाही. 

देशाच्या "जीडीपी'मध्ये लघुउद्योगांचे योगदान 30 ते 35 टक्के असून विख्यात व्यवस्थापन सल्लागार संस्था "केपीएमजी'च्या अहवालानुसार देशातील एकूण व्यापार- उदिमामध्ये "एमएसएमई'चा वाटा 36 टक्के, उत्पादन प्रक्रियेत 31 टक्के, तर इतर उद्योग व्यवहारात "एमएसएमई'चे प्रमाण 33 टक्के आहे. या आकडेवारीवरून "कोरोना'नंतरच्या आर्थिक- व्यावसायिक आव्हानपर स्थितीत "एमएसएमई' क्षेत्रापुढील आव्हानांची व्यापकता स्पष्ट होते. "कोविड-19'चा प्रादुर्भाव हा आर्थिक उलाढालीच्या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत झाला. याच टप्प्यात प्रमुख उद्योग व "एमएसएमई' उद्योगांच्या ग्राहकांकडून त्यांचे उत्पादन व सेवा यासंदर्भात सर्वाधिक मागणीसह उलाढाल असते. नेमक्‍या याच वेळी "कोरोना'चा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होणे म्हणजे लघुउद्योजकांच्या संदर्भात सांगायचे तर कापणीला आलेल्या पिकांवर अवकाळीची अवकळा यावी अशी दुर्दैवी स्थिती निर्माण होण्यासारखे आहे. 

या पार्श्‍वभूमीवर "एमएसएमई' क्षेत्राने स्वतःला सावरून स्थिर व यशस्वी होण्याचे आव्हान मोठे आहे. ते कठीण असले तरी अशक्‍य नाही, याची परिश्रम आणि प्रयत्नपूर्वक खातरजमा करण्यासाठी पुढील मुद्‌द्‌यांचा विचार व्हावा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) व्यावसायिक स्थितीनुसार बदल ः "कोविड-19'मुळे व्यावसायिक गरजा आणि परिस्थितीत कुठले आणि कसे व कितपत बदल झाले आहेत याचा मागोवा घेणे निकडीचे आहे. हे बदल आणि त्यांचे स्वरूप जाणून घेतल्यास "कोविड-19'मुळे नेमकी कोणती व्यावसायिक आव्हाने मुख्य उद्योग व लघुउद्योजकांपुढे आहेत याची कल्पना येईल. या बदलत्या तपशिलानुरूप "कोविड-19'पूर्व व त्यानंतरच्या व्यावसायिक गरजांनुरूप व बदलत्या वस्तुस्थितीच्या आधारे वस्तुनिष्ठ आकलन करून घेणे महत्त्वाचे ठरेल. आपल्या उद्योगाची त्यानुसार नवी आखणी करणे उपयुक्त ठरेल. आर्थिक- व्यावसायिक, वैचारिक, औद्योगिक, वैयक्तिक- कौटुंबिक, सामाजिक संदर्भातील आव्हाने आपल्या पुढ्यात आहेत. संबंधित जोखमीचे स्वरूप आणि परिणाम यांचा अभ्यास संबंधित उद्योग व लघुउद्योजकाने करून उपाययोजना करावी. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2)अष्टावधानी भूमिका: उपाययोजना करताना लघुउद्योजकांनी परिस्थितीचे भान ठेवून अष्टावधानी भूमिका आवश्‍यक आहे, त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्र, संबंधित व्यवसायांवर व मुख्य म्हणजे आपापल्या उद्योगांवर काय आणि कसे परिणाम झाले, हे तपासले तर त्यांचे प्रयत्न आणि उपाययोजनांना दिशा मिळू शकेल. बदलांचे परिणाम सर्वच उद्योगांवर झाले आहेत. प्रामुख्याने व्यावसायिक अनिश्‍चितता, अनपेक्षितपणे झालेले मोठे बदल, व्यवसायचक्राला बसलेला धक्का व खीळ, उद्योग-व्यवसायाची फेरमांडणी, तंत्रज्ञान- प्रक्रिया सेवा इ. मध्ये करावे लागलेले मोठे बदल, मुख्य उद्योग वा ग्राहकांच्या बदलत्या गरजा, सरकार वा वित्तीय संस्थांची नवी धोरणे, उद्योगाला पूरक कच्चा माल, प्रक्रिया, वाहतूक, विक्री इ.मध्ये करावे लागणारे बदल, बदलत्या व्यावसायिक व प्रक्रियाविषयक गरजांनुरूप कामगारांची कौशल्यक्षमता व "एमएसएमई'च्या संदर्भात महत्त्वाचे म्हणजे संबंधित उद्योजकाची निर्णयक्षमता व मानसिकता इ. संदर्भात अपरिहार्यपणे दिसणार आहेत. 

3) सकारात्मक मानसिकता ः "एमएसएमई' उद्योगांनी "कोविड-19'नंतर आपण लघुउद्योग स्तरावर काय गमावले, याच्याच जोडीला अद्यापही काय सक्षम आहे, हे पाहावे. ही सकारात्मक मानसिकता महत्त्वाची ठरेल. 

4)परिणाम विचारात घेऊन व्यवसाय आखणी ः "कोविड-19'मुळे मुख्य उद्योगांसह त्यांचे ग्राहक व त्यांच्यासाठी पूरक; पण महत्त्वाच्या स्वरूपाचे काम करणाऱ्या लघुउद्योगांवर व त्यांच्या व्यवसायावरील परिणामांचा पडताळा करणे आवश्‍यक ठरते. या पडताळ्यावर आधारित व्यावसायिक भूमिका घ्यावी. नजीकच्या काळात व नंतर होणाऱ्या व्यावसायिक परिणामांना सामोरे जाताना त्यावर मात करण्यासाठी धोरणात्मक, तांत्रिक, प्रक्रियाविषयक, उत्पादनाशी निगडित उपाय योजावेत. 

राजधानी दिल्ली : लसीला लागण राजकारणाची?​

5) ग्राहकांचा विचार - बदलत्या व नव्या गरजांची पूर्तता कार्यक्षमपणे करणे व त्याला आर्थिक धोरण- नियोजनाची नव्या संदर्भासह जोड देणे व या गरजांनुरूप उद्योग- व्यवसायाची नव्याने आखणी करणे "एमएसएमई' क्षेत्रासाठी अपरिहार्य आहे. "कोविड- 19' नंतरच्या बदलत्या काळानुरूप आपले उत्पादन आणि उत्पादन प्रक्रियेत व्यापक बदल करून वाहन आणि त्यांच्या उपकरणांच्या जागी व्हेंटिलेटरचे उत्पादन सुरू करणे ही एकच बाब बदलत्या व्यावसायिक स्थितीची चुणूक दाखवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com