देह-संदेह : बॉडी डबल ते डेटा डबल..

स्मार्ट वॉच, अॅप्स, फिटनेस ट्रॅकर्समुळे आरोग्याची ‘सांख्यिकी सजगता’ वाढली; पण देहाचा समग्र अनुभव विसरून आपणच स्वतःचा ‘डेटा डबल’ तयार करत आहोत का, असा प्रश्न उपस्थित
The Rise of Statistical Awareness and Quantified Self

The Rise of Statistical Awareness and Quantified Self

Sakal

Updated on

तुम्ही सकाळी फिरायला जात असाल तर हातात ‘स्मार्ट वॉच’ घालून फिरणारे वा धावणारे अनेक जण तुम्हाला दिसत असतील. कदाचित तुम्ही स्वत:ही असे घड्याळ घालून फिरत असाल. अशी काही डिजिटल घड्याळे आणि पट्ट्या लावून व्यायाम करणारी मंडळी तुम्ही जिममध्येही पाहिली असतील. दिवसभर बोटांमध्ये इवलीशी स्मार्ट अंगठी घालून वावरणारेही कदाचित तुम्ही पाहिले असतील. पाव लिटर, अर्धा लिटर, एक लिटर अशा खुणा असलेल्या बाटल्यांमधून वेळोवेळी पाणी पिणारेही तुम्हाला माहीत असतील. आरोग्यविषयक आपल्या सर्वसामान्य गप्पांमधील बदलही तुम्ही कदाचित टिपला असेल. “पाणी भरपूर प्यायला हवे” असे न म्हणता आजकाल आपण “दिवसभरात किमान तीन लिटर तरी पाणी प्यायलाच पाहिजे” असे म्हणू लागलो आहोत. ‘रात्री मस्त झोप झाली’ यासोबतच ‘अडीच तासांची डीप स्लीप झाली’ असे उल्लेख येऊ लागले आहेत. खूप चाललो असे न म्हणता ‘दहा हजार पावले चाललो’ असे म्हणू लागलो आहोत. आपले वजन आता फक्त ‘बरेच’ घटत किंवा वाढत नाही. ते ‘अमुक तमुक’ किलोने घटते किंवा वाढते. एरवी फक्त आजारपणात ज्यांचा उल्लेख यायचा अशा बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल वगैरेंचे आकडे शेअर बाजाराच्या इंडेक्ससारखे दैनंदिन माहितीचा भाग होऊ लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com