

Bollywood Politics
sakal
शेखर गुप्ता
हे गृहीत धरणे थोडे धाडसाचे ठरेल की, हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकानेच आदित्य धर यांचा धुरंधर आणि सिद्धार्थ आनंद यांचा पठाण (२०२३) हे दोन्ही चित्रपट पाहिले आहेत. मात्र सगळे जण जरी चित्रपट पाहणारे नसतील तरी, या दोन्ही चित्रपटांमुळे निर्माण झालेली चर्चा आणि वाद यांची माहिती बहुतेकांना असेलच.