कर्बमुक्तीच्या पाऊलवाटा : चल मेरी सायकल!

हरितगृह या अनिष्ट परिणामाला कारणीभूत असणाऱ्या वायूंमध्ये उष्णता स्वत:मध्ये सामावून घेणाऱ्या कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे नाव घेतले जाते.
Cycle
CycleSakal
Summary

हरितगृह या अनिष्ट परिणामाला कारणीभूत असणाऱ्या वायूंमध्ये उष्णता स्वत:मध्ये सामावून घेणाऱ्या कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे नाव घेतले जाते.

हरितगृह या अनिष्ट परिणामाला कारणीभूत असणाऱ्या वायूंमध्ये उष्णता स्वत:मध्ये सामावून घेणाऱ्या कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे नाव घेतले जाते. कार्बन डायऑक्साईड वायू वर्णपटातील इन्फ्रारेड २००० ते १५००० नॅनोमीटर तरंग लांबी असलेल्या विद्युत चुंबकीय लहरी सहज सामावून घेतो. पाणी आणि सोडा वॉटरची बाटली एखाद्या दिव्याखाली ठेवली तर सोडा वॉटरमधील पाणी जास्त गरम झाल्याचे आढळेल. कारण त्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड दाबाखाली भरलेला असतो. कार्बन डायऑक्साईड मधील ऊष्णता पुन्हा वसुंधरेच्या वातावरणात प्रक्षेपित झाल्याने ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतो. औद्योगिक क्रांती, औष्णिक वीज निर्मिती आणि मानवाचे विविध उपक्रम वाढल्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात प्रदूषण करणारे पदार्थ वातावरणात मिसळतात.

औद्योगिकीकरण होण्याच्या आधी जेवढा कार्बन डायऑक्साईड पृथ्वीच्या वातावरणात होता त्याच्या दुप्पट कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तर वसुंधरेच्या पृष्ठभागावरचे तापमान आधी होतं त्यापेक्षा १.५ ते ४.५ अंश से. ने वाढेल. आजच्या घडीला जागतिक औद्योगिकीकरण व्हायच्या आधी कार्बन डायऑक्साईडचे मूळ प्रमाण होते त्याच्या १.४ पट वाढलंय. मोटार जेव्हा एक लिटर पेट्रोल वापरून काही किलोमीटर अंतर जाते तेव्हा ती वातावरणात २.३ किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड सोडते. याचे बरेच दुष्परिणाम आहेत. साहजिकच हरितगृह परिणामाला चालना देणाऱ्या कार्बन डायऑक्साईडला अटकाव बसला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यक्तीला फार मोठं योगदान देता येईल, असं नाही; पण खारीचा वाटा उचलता येईल! ते कसं काय? एक किलोग्रॅम वजन एक किलोमीटर अंतरावर नेण्यासाठी किती ऊर्जा लागते, याचे संशोधन "बायोमेकॅनिक्स"च्या संशोधकांनी केलं आहे. त्यांच्या मते कोणत्याही पळणाऱ्या, उडणाऱ्या किंवा पोहोणाऱ्या प्राण्यांपेक्षा सायकलवाला जास्त कार्यक्षम असतो.

एवढंच नव्हे तर मोटार आणि (जेट) विमानापेक्षा सायकल जास्त कार्यक्षम आहे! साहाजिकच छोट्या अंतरासाठी शक्य तेथे सायकल चालवली तर बरेच फायदे होऊ शकतात. विशिष्ट अंतर पार करण्यासाठी चालताना जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा सायकलने कमी ऊर्जा खर्च होते. शिवाय सायकलचा वेग चालण्यापेक्षा चार पट जास्त असतो. यामुळे वेळ वाचतो. सायकलला इंजिन नसल्यामुळे पेट्रोल सारखे (पुनरुत्पादित न होणारे) कोणतेही इंधन लागत नाही. इंजिन नाही म्हणून अंतर्गत ज्वलन होऊन धूर होत नाही. आवाजही होत नाही. याचा अर्थ हवेचं आणि ध्वनीचं प्रदूषण होत नाही. सायकल चालवायला आणि पार्क करायला कमी जागा लागते, हा अजून एक फायदा आहे. डेन्मार्क, जर्मनी आणि नेदरलँडमध्ये त्यांच्या लोकसंख्येपेक्षा सायकलींची संख्या जास्त आहे.

मोटार साधारणतः एक लिटर पेट्रोलमध्ये १२ किलोमीटर अंतर पार करते. तेवढे अंतर एखाद्याने सायकलवरून पार केले तर २.३ किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये पसरणार नाही. सुटीच्या दिवशी बाजारहाट करण्यासाठी किंवा छोटी मोठी कामे करण्यासाठी सायकलचा वापर केला तर दोन-तीन मोठे वृक्ष जेवढा कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतात तेवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळणार नाही. याचे कारण एक मोठा वृक्ष प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) क्रियेमध्ये एका वर्षात २३ किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. एका संशोधकाने अजब संशोधन केलं आहे. त्याच्या मते चालताना एका मिनिटात आपण जेवढा कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळतो, त्यापेक्षा सायकलवरून जाताना कमी मिसळतो! अर्थात पायी चालणंदेखील अनेक दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपणही शक्य तेथे पायी चालावे. सायकलचा वापर करून पर्यावरण स्वच्छ राखू शकतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com