
अरुण खोरे
मानवी हक्कांची जी लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली, त्यातील महत्त्वाचा आणि पहिलावहिला टप्पा म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा. अमेरिका आणि ब्रिटनमधून उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर बाबासाहेबांनी संस्थात्मक, संघटनात्मक कामाला सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना झाली. त्यानंतर कोकणपट्टीत असलेल्या महाडच्या टापूत ‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद’ भरवण्याचे ठरले. त्याची पूर्वतयारी सुरू झाली.