कोरोनावरील उपायांचे स्वरूप व दिशा

coronavirus
coronavirus

कोरोनावरील उपायांच्या लेखांचा सध्या सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. कधी व्हाॅट्सॲपवर आयुर्वेदिक उपाय येतात, तर कधी ‘मालेगाव पॅटर्न’ सांगितला जातो, कोणी स्वतःचे काढे सांगतो, तर कोणी औषधांची जाहिरात करतो. मात्र, कोरोना या सर्व तज्ज्ञांच्या औषधांची व उपायांची खिल्ली उडवत वाढतच चालला आहे. त्यामुळेच नेमक्या उपायांची चर्चा आवश्यक आहे.  

कोरोनावर उपाय म्हणून बऱ्याच वेळा व्हाॅट्सॲपवर संदेश येतात आणि ते पडताळणी न करता पुढे पाठवले जातात. बऱ्याचदा प्रियजनांच्या काळजीपोटी असे केले जात असले तरी माहिती अशास्त्रीय असेल तर हानी संभवते. त्यामुळे फसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वास्तविक तज्ज्ञांनी पुढे  येऊन  मुद्देसूद व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. तेवढ्या प्रमाणात ते होताना दिसत नाही. याउलट अज्ञानी लोकांनी व्हाॅट्सॲप, फेसबुक व इन्स्टाग्रामवर लेखांचा खच पाडला असून, त्यात सर्वसामान्य माणूस गोंधळात पडतो.

लक्षणे कोणती?
कोरोना हा फ्लूसारखा संसर्गजन्य विषाणू आहे. त्यामुळे होणाऱ्या आजारात मुख्यतः सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत. काही रुग्णांत अंग व घसा दुखणे, चव न कळणे, वास न येणे, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, बोलायला त्रास, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, जुलाब, डोकेदुखी, डोळे येणे असे वेगवेगळी लक्षणे दिसतात. थोडक्यात, सर्व प्रकारची लक्षणे दिसतात. यातील श्वास घ्यायला त्रास, दम लागणे, छातीवर दाब येणे आणि बोलता न येणे ही लक्षणे गंभीर मानली जातात. सर्दी,खोकला झाला म्हणजे कोरोना आहे, असे समजून घाबरून जाऊ नये. दुर्लक्षही करू नये. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

उपचारांची दिशा
डॉक्टर रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा, तसेच तपासणी करून योग्य उपचार करतात. ऑक्सिजनची मात्रा बघणे महत्त्वाचे. ती ९०च्या पुढे असणे चांगले. ती बघताना रुग्णाचा हात ओला व थंड नसावा. मशिनवर रिडींग यायला वेळ लागू शकतो, पण घाबरू नये. तपासणीदरम्यान काही लक्षणे आढळून आल्यास ‘कोविड’ची चाचणी करण्यास सांगितले जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर उपचार केले जातात. त्यात विविध प्रकारची औषधे वापरली जातात. फॅवीपिरावीर, रेमडेसिवीर आणि आयवरमेक्टिन ही अँटीव्हायरल औषधे प्रमुख. स्टिरॉइड्समध्ये प्रामुख्याने डेक्सामिथाझोनचा वापर होतो.  प्रतिजैविके गटातील डॉक्सिसायक्लीन, अझीत्रोमायसिन तसेच एरिथ्रोमायसिन या औषधांचा; तसेच रक्त पातळ करणाऱ्या औषधांचाही वापर होतो. प्लाझ्मा थेरपी तसेच टोसिलिझुमॅब या औषधाचा वापर केला जात आहे.

प्रतिजैविके का वापरावीत?
कोविड आजारात रुग्णांमधील दोन रिसेप्टर्सचे महत्त्‍व आढळून आले आहे - एक म्हणजे ‘सीडी २६’, जो वय वाढल्यावर म्हणजे वृद्धत्वाच्या प्रक्रियेमध्ये वाढतो आणि दुसरा ‘एसिई -२’. हे दोन रिसेप्टर असणाऱ्या पेशींना कोरोना विषाणू लक्ष्य करतो. या पेशी ‘कोविड १९’च्या सायटोकाईन स्टॉर्म अवस्थेतील शरीरातील वादळ (इन्फ्लमेशन) वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या पेशी ‘आयएल ६’सारखे सायटोकाईन स्टॉर्मचे मध्यस्थ वाढवतात. नवीन संशोधनानुसार, ही प्रतिजैविके ‘आयएल ६’ला प्रतिबंध घालतात, तसेच विषाणूंच्या संख्यावाढीला आळा घालण्यास मदत करतात. डोक्सिसायक्लीन एक उत्कृष्ट पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. पेशंट दुसऱ्या अवस्थेत (फुफ्फुसातील अवस्था) गेल्यावर त्याला ऑक्सिजन द्यावा लागतो आणि तिसऱ्या अवस्थेत (सायटोकाइन स्टॉर्म) व्हेंटिलेटर लागू शकतो व गुंतागुंत टाळण्याची, तसेच झालेली गुंतागुंत कमी करण्याची औषधे द्यावी लागतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनावरचे तीन उपाय
‘सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम लाईस इन प्रॉब्लेम इटसेल्फ.’ अशी म्हण आहे.  म्हणजे कोरोनाचा उपाय कोरोनाच आहे.

कोरोना लस
लस म्हणजे कोरोना विषाणू, मृत अथवा कमी ताकदीचा किंवा त्यांचा काही महत्त्वाचा भाग. यामुळे पांढऱ्या पेशी, मेमरी पेशी यांना विषाणूला ओळखण्याची ताकद येते, तसेच त्याविरुद्ध अँटिबॉडीज व प्रतिकार करणाऱ्या पेशी तयार करण्याची क्षमता निर्माण होते. ‘एमएमआर’ची लसदेखील यासाठी काही अंशी मदत करते. ‘एमएमआर’ अथवा ‘एमएमआर’ची लस कोरोनाविषाणूशी असलेले साधर्म्य, तसेच इननेट उतींची क्षमता वाढवण्याची पात्रता यांमुळे वापरावी, असे बऱ्याच शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

प्रतिकारशक्ती कशी वाढवावी?
फळे, कडधान्ये, अंडी, दूध, चिकन, पनीर, पालेभाज्या यांमधून आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स व प्रथिने मिळतात. शारीरिक व्यायाम, योग तसेच मानसिक आरोग्य यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

मानसिक आरोग्य कोरोनाच्या संक्रमणातून बरे होण्यासाठी आवश्यक आहे. 

अतिदक्षता विभागात गेलेला रुग्ण त्याची इच्छाशक्ती गमावून बसतो असे आढळते. अशा रुग्णांना टीव्ही लावून त्यावर त्यांच्या घरातील होणाऱ्या सुखद गोष्टींचे ५ ते १० मिनिटांचे रेकॉर्डिंग दाखविल्यास त्यांच्यामध्ये नवीन उमेद येऊन लढण्याची इच्छाशक्ती जागी होईल, असे सुचवावेसे वाटते. मनाच्या शक्तीचा वापर कोरोनाविरुद्ध करून बघूया.

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com