मन मंदिरा... : भीती रक्ताची

हिमोफोबिया ही समस्या म्हणजे ‘विशिष्ट फोबिया’ आहे. अशा व्यक्ती ज्या प्रसंगात रक्त दिसणार आहे, असे सर्वच प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतात.
Hemophobia
HemophobiaSakal

एका मित्राने मैत्रिणीला लिहिलेला ‘मेसेज’ मजेशीर आहे. – “ I have blocked you because my words bleed and you have Hemophobia. ह्यातला गमतीचा भाग सोडून देऊ पण रक्ताची अनाठायी, अवास्तव भीती असणाऱ्या अनेक व्यक्ती आढळतात. लहानपणापासून आपल्याला बऱ्याचवेळा रक्त दृष्टीस पडतं. कधी कुणाला खरचंटतं, कधी कुणाच्या दातातून रक्त येतं तर कधी घोळणा फुटतो. पण म्हणून आपण एका प्रमाणाबाहेर अस्वस्थ होत नाही. हे असं चालायचंच, असं आपलं मन घेतं. पण काही व्यक्ती अशा असतात, की ज्यांना रक्ताच्या दिसण्याने अक्षरशः घाम फुटतो. त्या हादरून जातात. काही जणांना चक्कर यायला लागते किंवा उलटी होते. त्यांना ‘हिमोफोबिया’ असू शकतो. म्हणजे रक्ताची अतिरिक्त, अवास्तव भीती.

हिमोफोबिया ही समस्या म्हणजे ‘विशिष्ट फोबिया’ आहे. अशा व्यक्ती ज्या प्रसंगात रक्त दिसणार आहे, असे सर्वच प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या आवश्यक अशा चाचण्या करणं सुद्धा टाळण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टरांची वेळ घेऊनही त्यांच्याकडे जाणे टाळतात. रक्तपेढीत जाणं, रक्तदान करणं दूरच राहिलं. कुणा नातेवाईकाला रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी जायचीदेखील त्यांना भीती वाटते. Operation Theater असा बोर्ड दिसला तरी वेगात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही वर रक्त पहाणं किंवा रक्ताचा विचार मनात येणं ह्यालाही घाबरतात. इंजेक्शन घेताना सिरींजला लागलेलं थेंबभर रक्त ह्यांना अस्वस्थ करतं. ह्या disorder मधे पुढील शारिरीक लक्षणं दिसू शकतात – १.श्वास घ्यायला त्रास २. वाढलेला रक्तदाब ३. वाढलेली नाडीची गती. ४. छातीत दुखण्याची भावना ५. थरथर कापणे ६. डोकं दुखल्याची भावना ७. घाम फुटणे ८. चक्कर येणे वगैरे. यातील भावनिक लक्षणे – १. अतिशय अस्वस्थता २. प्रसंगातून पळ काढावासा वाटणं ३. मनावरचा ताबा सुटणे ४. मरून जाऊ अशी भावना ५. प्रचंड हतबलता इत्यादी.

लहान मुलांमध्ये साधारणपणे प्रचंड रडणे, थयथयाट करणे, अतिहट्टीपणा करणे किंवा लपून बसणे अशी लक्षणे दिसू शकतात.

कारणे - मेंदूतील रासायनिक असंतुलन, आनुवंशिकता, दुर्बल व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींमुळे होमिओफोबिया सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. दुबळं व्यक्तिमत्व तसेच ज्यांना panic disorder, सोशल फोबिया किंवा इतर समस्या असणाऱ्यांच्या बाबतीत ही समस्यादेखील उदभवण्याची disorders आहेत त्यांच्या बाबतीत ही disorder निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तसेच भूतकाळातील, लहानपणातील भीतीदायक दुर्घटना, जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या बाबतीत घडलेले अपघात, त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून न पाहता येणे आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता ही कारणेही असू शकतात. बहुधा ह्या समस्येची सुरवात लहानपणी झालेली आढळते.

उपचार - फोबियाग्रस्त व्यक्तीला टप्प्याटप्प्याने भीतीचा सामना करायला शिकवलं जातं. उदा. रक्ताची आणि शरीरातील त्याच्या कार्याची माहिती चित्ररूपाने देणे, laptop वर रक्ताचे चित्र, रक्तदानाचे किंवा रक्त देतानाचे दृश्य दाखवणे, इंजेक्शनची सिरींज दाखवणे. रक्त तपासणीच्या वेळी रक्त दाखवणे. रक्ताला स्पर्श करायला लावणे. त्या दरम्यान श्वसनावर लक्ष केंद्रित करणं, मनात सकारात्मक प्रतिमा आणणं, वर्तमान क्षणात रहाण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक तंत्रांचा वापर करायला तज्ञ शिकवतात. स्वस्थतेच्या अनेक तंत्रांपैकी आपल्या मानसिक जडणघडणीला, स्थितीला अनुकूल अशा तंत्राचा वापर करणे, श्वासाच्या तंत्रांचा वापर करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. ह्या सर्वं गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्याची मनाला सवय लावणे आणि त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही ह्याची मनाला पटवणे इत्यादी शक्य त्या गोष्टी केल्या जातात. बराच काळ हा प्रयोग केल्यावर तसेच जोडीला positive visualization तंत्राचा वापर आणि इतर थेरपीजच्या सहाय्याने भीतीवर मात करायला, भीतीतला फोलपणा जाणवून घ्यायला शिकवलं जातं. अस्वस्थतेवर मात करायला शिकवलं जातं.

मॉडेलिंग थेरपीज - ह्यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या भीतीवर मात केली त्यांचे सकारात्मक प्रेरणादायी अनुभव, व्हीडीओज दाखवून प्रोत्साहन दिलं जातं. तसं करायला प्रवृत्त केलं जातं. Cognitive Behavioural Therapy (CBT): CBT मधे व्यक्तीला त्याचं नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती आणि त्यातून घडणारी नकारात्मक वर्तणूक बदलायला शिकवलं जातं. सकारात्मक विचारपद्धती आणि सकारात्मक वर्तणूक पद्धती रुजवायची कशी हे शिकवलं जातं. बऱ्याचवेळा ह्या उपचार पद्धती जोडीनं वापरल्यास उपयुक्त ठरतात. योग्य प्रयत्नांनी या समस्येवर मात करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com