
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
भारतात पहिल्यांदाच उच्च शिक्षणाचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावला गेला आहे. एकविसाव्या शतकात भारताने आर्थिक विकासाशी आणि विकसित भारताशी निगडित जी उद्दिष्टे ठरवलेली आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षणाचा एक साधन म्हणून कशा पद्धतीने उपयोग करता येईल, या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच शिक्षणक्षेत्राकडे पाहिले जात आहे.