
Diwali Festival of Lights
sakal
तिन्हीसांजेला ‘शुभं करोति कल्याणम्’ हा श्र्लोक म्हणून आरोग्य, धन, संपदेसाठी प्रार्थना करणे, मनातील नकारात्मकतेचा विनाश होण्यासाठी ज्योतीला नमस्कार करणे ही आपली भारतीय संस्कृती. म्हणूनच ज्या उत्सवात एखादा-दुसरा दीप नाही, तर दिव्यांची रांग लावायची असते, तो दीपावली उत्सव भारतातील सर्वांत महत्त्वाचा समजला जाणे स्वाभाविक आहे.