हौस ऑफ बांबू : याला सहजीवन ऐसे नाव..!

‘साधनाताई बाबा आमटे सहजीवन पुरस्कार’चा पहिला मान सर्जनशील दाम्पत्य अनुराधा पाटील व श्री. रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्या नावावर; कला-साहित्य क्षेत्रातील जोडीनं केलेल्या कार्याला सलाम
A Legacy of Togetherness: First Sadhanatai Baba Amte Sahajeevan Award Announced

A Legacy of Togetherness: First Sadhanatai Baba Amte Sahajeevan Award Announced

Sakal

Updated on

कु. सरोज चंदनवाले

नमस्कार! प्रपंचरुपी रथाची दोन्ही चाके एकसमयावच्छेदेकरोन एकाच दिशेने गरगरा मार्गक्रमणा करु लागतात, तेव्हा प्रगतीच्या मार्गाचे महामार्ग होतात, आणि मंझिल वेगाने गाठता येते…वाह! हे वाक्य सुचल्यावर स्वत:ला बक्षीस म्हणून मी पटकन पर्समधून एक चाकलेट काढून खाऊन टाकलं! हे वाक्य सुचलं कारण मनाला चैत्रपालवी फुटावी अशी बातमी अंबाजोगाईतून आली आहे. तिथल्या ‘साधना सेवाभावी संस्थे’तर्फे यंदापासून ‘साधनाताई बाबा आमटे सहजीवन पुरस्कार’ देण्याचं ठरवलं आहे. यंदा साधनाताईंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं हा पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि त्यांचे जबरदस्त जीवनसाथी साहित्य क्रांतिसिंह श्री. रा. कौतिकराव ठाले पाटील यांना जाहीर झाला आहे. पाटील दाम्पत्याचं मी मनापासून अभिनंदन करत्ये! ठालेसर आणि बाईंच्या निरपेक्ष पाठबळाचा आधार ज्या प्रचंड विद्यार्थीवर्गाला आजवर मिळालाय, त्यांना तर दुप्पट आनंद होईल. ठालेसरांच्या गडगडाटी गर्जनेने वेळोवेळी थरकापलेल्या साहित्यकर्मींनीही यानिमित्ताने दोन टाळ्या हळूच वाजवून घ्याव्यात!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com