अग्रलेख : युद्धाचे कृष्णविवर

कोणताही प्रश्‍न सोडविण्यासाठी शक्तीचा वापर करणे, हे फक्त लहान मुले किंवा बडी राष्ट्रे यांनाच सुचते! — डेव्हिड फ्रिडम
War Creates Global Economic Black Hole

War Creates Global Economic Black Hole

Sakal

Updated on

युद्ध म्हणजे केवळ मुत्सद्देगिरीचेच नव्हे तर एकूण मानवी बुद्धीचेच अपयश, असे तत्त्वज्ञांना वाटते. बहुतांश वेळा युद्धाची ठिणगी पडते ती असुरक्षितता, स्पर्धा आणि अविश्वासातून. युद्धाचा निर्णय सत्तादांडगे, शक्तिशाली लोक घेतात; पण परिणाम मात्र इतरांना भोगावे लागतात. सर्वसामान्यांचे जगणे अवघड होते आणि युद्धाशी संबंध नसलेल्या देशांनाही लढणाऱ्या देशांइतक्याच युद्धझळा सहन कराव्या लागतात. छोट्या संघर्षातून सुरू झालेले युद्ध हाताबाहेर जाऊन त्याची परिणती न बदलता येणाऱ्या परिणामांमध्ये कशी होते, हे पहिल्या-दुसऱ्या महायुद्धांनी दाखवून दिले आहे.तरीही माणूस त्यातून काही शिकला की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com