
स्वातंत्र्य आधी की समाज सुधारणा, हा मुद्दा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चिला जात असे. असाच मुद्दा ग्रीनलँडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी डेमोक्रॅटिक पक्षाने उपस्थित करीत स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक पाया भक्कम करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.