नअस्कार! गेल्या महिनाभरात जगात (पक्षी : पुणे) दोन महत्त्वाच्या सांस्कृतिक घटना घडल्या. रसिकांच्या आणि वाचकांच्या आणि रसिक-वाचकांच्या हाती दोन ऐवज पडले. (खुलासा : हे तिन्ही गट वेगवेगळे आहेत, याची नोंद घ्यावी.) एक मोठा ‘ऐवज’ अमोल पालेकरांचा. कला-कारकीर्दीतल्या अनेक घटनांची चिक-मोत्यांची माळ या ऐवजात समाविष्ट आहे.