नअस्कार! तशी मी लहानपणापास्नंच पर्यावरणवादी आहे. पुढे उमलत्या वयात (म्हंजे गेल्या काही वर्षातच-) मला कविता वगैरे होऊ लागल्या. कागदाचा असा वापर बरा नव्हे, असं मला काही कुचकट (पक्षी : पुणेकर) टोमणे ऐकायला मिळाले. कागद बांबूपासून बनतो. बांबू हे गवत आहे. बांबूची बेटंच्या बेटं कापून त्याचा कागद तयार करायचा, आणि त्यावर लिहून लिहून आपण लेखक-कवी व्हायचं, हे पूर्णत: पर्यावरणाच्या विरोधातलं वागणं आहे, हे मला पटू लागलं.