देह-संदेह : वळवून अक्षरांना केले तुला शहाणे..

डिजिटल फर्स्ट शिक्षणातून स्वीडनसह नॉर्डिक देशांचा यू-टर्न; टॅबलेट, लॅपटॉपला रामराम देत पुन्हा पुस्तक, वह्या, पेनकडे परतण्यामागील मुलांच्या घटत्या वाचन-लेखन क्षमतेचा धडा
Attention Span Erosion: Analyzing the Research from Karolinska Institute

Attention Span Erosion: Analyzing the Research from Karolinska Institute

Sakal

Updated on

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

आपल्याकडे जूनमध्ये शाळा सुरू होतात. नवी पुस्तके, नव्या वह्या किंवा पाट्या, नव्या कंपासपेट्या असा सगळा जामानिमा घेऊन मुलं उत्साहाने शाळेत येऊ लागतात. स्वीडनमध्येही यंदा ऑगस्टमध्ये असेच चित्र दिसणार आहे. तुम्ही म्हणाल यात नवल ते काय; पण पुस्तक, वह्या आणि पेन घेऊन शाळेत येणारी मुलं हे चित्र स्वीडनमध्ये गेली काही वर्षे दिसतच नव्हते. मुलं शाळेत त्याच उत्साहाने यायची; पण त्यांच्यासोबत वह्या पुस्तके नसायची. असायचे ते टॅबलेट. त्यांचे सारे वाचणे, लिहिणे, आकृत्या काढणे घडायचे ते टॅबलेटच्या गुळगुळीत पडद्यावर. यंदा मात्र तसे नसणार. कारण स्वीडिश सरकारने शाळांमधून टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल हद्दपार केले आहेत. पुस्तक, वह्या, पेन आता वर्गांमध्ये परत दिसणार आहेत. या बदलासाठी सरकारने तब्बल वीस कोटी डॉलरची तरतूदही केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com