

Indian Constitution Day
sakal
ॲड. जयदेव गायकवाड
पं.जवाहरलाल नेहरु यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव १३ डिसेंबर १९४६ रोजी घटनासमितीच्या सभेत मांडला आणि घटनासभेचे काम सुरू झाले. उद्दिष्टांचा ठराव मांडताना पं.नेहरुंनी सांगितले की, हा ठराव म्हणजे एक प्रतिज्ञापत्र असून या देशाच्या आगामी लोकशाहीची ध्येये आणि उद्दिष्टे त्यात नमूद आहेत.