
गिरीराज सिंह
शाश्वत वस्त्र परिसंस्था निर्माण करण्यासाठी ग्रामीण हातमाग आणि हस्तकला समूहांना पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे समूह विविध कुटुंबे आणि समुदायांनी पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवलेल्या भारतीय कारागिरीच्या परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. खासगी क्षेत्र आणि सामाजिक उपक्रमांनी या क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यात प्रशंसनीय भूमिका बजावली आहे. त्यांचे कार्य पर्यावरणपूरक साहित्य, स्थानिक उद्योजकता, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण तसेच पारंपरिक पद्धतींसह तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण यासह नावीन्यपूर्णतेमध्ये विस्तारले आहे.